नोव्हेंबर २०२० मध्ये पेट्रोल ८९.१० रुपये, डिझेल ७८.२६ आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६१९ रुपये इतके होते. त्यात सातत्याने वाढ होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला खार लागत आहे. यातच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने गतवर्षापासून अनेक कंपन्या, कार्यालये बंद राहिली. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला. कसेबसे दिवस कंठत जमापुंजीतून खर्च भागविला. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. कामाचे स्वरुप बदलले असले तरी मिळकत सुरू झाल्याने संसाराचा गाडा सुरळीत होण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र, जीवनात मूलभूत गरज झालेल्या वाहतुकीच्या साधनाचा वापर करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे, सिलिंडरचे दर सातत्याने वाढतच असल्याने तोकडी कमाईतून हे भागवायचे कसे, हा प्रश्न सतावत आहे. यावर केंद्र शासनाने विचार करावा, अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
पुन्हा लॉकडऊनची भीती
नव्या वर्षात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून दररोज तीन अंकी आकडा फुगत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुन्हा लॉकडाऊन तर लागणार नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. लॉकडाऊन लागल्यास पुन्हा रोजगार जाणार, मग या वाढत्या महागाईचा सामना कसा करणार, असे नाना प्रश्न मनात घर करीत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
कोट
मी गवंडी काम करून संसाराचा गाडा हाकत आहे. हे काम मिळविण्यासाठी मला रोज भानखेडाहून अमरावतीत यावे लागते. त्यामुळे मी जुनी दुचाकी खरेदी केली. मात्र, त्यात टाकावे लागणारे इंधनाचे दर वाढल्याने मजुरीच्या पैशातून पेट्रोलवर खर्च करायचे की, किराणा, मुलीचे कपडे घ्यायचे, असा प्रश्न पडतो.
- रमेश चव्हाण, पेट्रोल ग्राहक, भानखेडा
--
अच्छे दिन केवळ स् एकट्या माणसाची आवक असल्याने व दर महिन्याला भाव वाढतीवर असूनही सिलिंडर जीवनावश्यक वृबाब झाल्याने मुलांचे कपडे घेण्यासाठी साठविलेले पैसे सिलिंडरवर खर्च करावे लागले. सिलिंडरचे दर ७४४ असताना सबसिडी केवळ १६.१९ पैसे मिळते. दर नियंत्रणात आणायला हवे.
- जयश्री राठोड,
गृहिणी, गांधीनगर, अमरावती
--
डिझेलचे दर वाढल्याने पर्यटन, मालवाहतूक, प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे इतरही वस्तूंच्या किमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक संतुलन बिघडले आहे. इतर वस्तूंवरील सबसिडी आहे तशीच डिझेलवरही सबसिडी देण्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ होईल.
- अमित बारबुद्धे, डिझेल ग्राहक, अमरावती
ग्राफीक
पेट्रोल
१ नोव्हेंबर २० ८९.१०
१ डिसेंबर २० ९०.४४
१ जानेवारी २१ ९१.७७
१ फेब्रुवारी २१ ९४.७२
--
डिझेल
१ नोव्हेंबर २० ७८.२६
१ डिसेंबर २० ८०.४३
१ जानेवारी २१ ८१.९७
१ फेब्रुवारी २१ ८६.३३
---
गॅस सिलिंडर
१ नोव्हेंबर २० ६१९
१ डिसेंबर २० ६६९
जानेवारी २१ ७१९
फेब्रुवारी २१ ७४४