‘ड्रीम प्रोजेक्ट’ची विदारक स्थिती : ३,७२५ पैकी ९५९ कामेच पूर्ण, करोडोंचा निधी अखर्चितअमरावती : दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ची जिल्ह्यात विदारक स्थिती आहे. प्रशासकीय मान्यतेच्या तीन हजार २५४ कामांपैकी सद्यस्थितीत ९५९ कामेच पूर्ण झालेली आहेत. आठवड्यावर मार्च एंडींग आला असल्याने कित्येक कोटींचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. सन २०१६-१७ करिता सर्वच तालुक्यांमधील २५३ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून दोन हजार २८६ कामांना १४२ कोटी ५१ लाख ९ हजारांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तर एक हजार ८८६ कामांना कृषी विभागाद्वारा ११ कोटी ३५ लाख ४५ हजारांची आणि एकूण चार हजार १७५ कामांना १५३ कोटी ८६ लाख ५४ हजारांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३७२५ कामांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आली. तीन हजार २५४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक हजार २८४ कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यापैकी एक हजार ८३० कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ९५९ कामे सुरू आहेत. फक्त ९५९ कामेच मार्चच्या प्रारंभापर्यंत पूर्ण होऊ शकली आहे. यामध्ये कृषी विभागाची ८०५, लघुसिंचन जलसंधारण विभागाची ८५, लघुसिंचन जलसंधारण विभाग जिल्हा परिषदेची १५, मध्यम व लघु पाटबंधारे विभागाची २७, अमरावती मध्यम प्रकल्प विभागाची ४ व वनविभागाची ४ कामे पूर्णत्वास गेली आहे. तालुकानिहाय पाहता अमरावती तालुक्यात प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या १६५ पैकी ३२ कामे पूर्ण झाली आहे. भातकुली तालुक्यात १३६ पैकी १०६, तिवसा तालुक्यात १३० पैकी १४, चांदूररेल्वे तालुक्यात ९२ पैकी १२ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २६१ पैकी ४२, धामणगाव रेल्वे तालुक्यात १२ पैकी ५ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान आहे.निधी परत जाण्याची नामुष्कीअमरावती : मोर्शी तालुक्यात २३७ पैकी ७८, वरूड तालुक्यात ३०१ पैकी ४८, दर्यापूर तालुक्यात ६४४ पैकी ४१२, अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४२ पैकी ३९, अचलपूर तालुक्यात १५४ पैकी ५३, चांदूरबाजार तालुक्यात ८४ पैकी ५४, धारणी तालुक्यात ३६८ पैकी ५० व चिखलदरा तालुक्यात प्रशासकीय मान्यताप्राप्त ५२८ पैकी ११ कामेच फक्त मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली. आता आर्थिक वर्ष संपायला अवघा एक आठवड्याचा अवधी शिल्लक असल्याचे अखर्चित राहिलेला निधी परत जाण्याची नामुष्की यंत्रणावर ओढावणार आहे. (प्रतिनिधी)ही कामे सुरूसद्यस्थितीत जलयुक्तची ९५९ कामे सुरू आहेत. यामध्ये कृषी विभाग ५७, जलसंधारण विभाग ६९, लघुसिंचन जिप ८२, उर्ध्व वर्धा पाटबंधारे १, मध्यम व लघु पाटबंधारे विभाग १७ व वनविभागाची ७३० कामे सुरू आहेत.
दुष्काळावर मात कशी?
By admin | Published: March 26, 2017 12:03 AM