शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:11 AM

अमरावती जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३३० उपकेंद्र आहेत. इर्विन रुग्णालय, डफरीन रुग्णालयास चार उपजिल्हा रुग्णालयांत पेडियाट्रिक विभाग ...

अमरावती जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३३० उपकेंद्र आहेत. इर्विन रुग्णालय, डफरीन रुग्णालयास चार उपजिल्हा रुग्णालयांत पेडियाट्रिक विभाग आहेत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत इर्विनमध्ये ४, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, वरूड आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयांत प्रत्येकी पाच बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केलेली आहे. त्याशिवाय एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य अभियान) अंतर्गत २६ पैकी २३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी एनएचएम, एसएनसीयू, एनआयसीएच अंतर्गत ९ डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी काम करताना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञांची पदेच नाहीत. यामुळे तिसरी लाट आलीच तर या केंद्रांवर बालरोगतज्ज्ञांविना उपचार कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करता बालरोगतज्ज्ञांचा हा आकडा अपुरा आहे. तिसऱ्या लाटेत उपलब्ध मनुष्यबळ तोकडे पडणार आहे. यामुळे शासकीय यंत्रणेला तात्पूर्त्या स्वरूपाचे बालरोगतज्ज्ञ नियुक्त करावे लागणार आहे.

बॉक्स

तालुका स्तरावर खाटांचे नियोजन

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा फटका बसणार असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात जवळपास ६ हजार बालके कोरोना संक्रमित झाले. ही आकडेवारी बघता प्रत्येक तालुक्याला ६० खाटांचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले आहे. शिवाय अतिरिक्त साठवण व्यवस्थाही तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर देण्यात येत आहे. तेथून ऑक्सिजन वळते करावे लागणार आहे.

बॉक्स

जिल्ह्यात ऑक्सिजन बेड ६८५

जिल्ह्यात आयसीयूमध्ये ५१९ बेड आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या ६८५ आहेत. सामान्य बेडची संख्या ५२५ आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये एकूण १३१५ बेड असून, ९६९ बेड रिक्त आहेत. सुपर स्पेशालिटीतील कोविड सेंटरमध्ये एकूण २५१५ बेडपैकी १३४७ बेड रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोट

जिल्हा सामान्य रुग्णालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलांच्या उपचारार्थ ५० बेडचे नियोजन केले आहे. याशिवाय तालुका स्तरावर अतिरिक्त बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत बेडच्या तुलनेत मनुष्यबळ आरोग्य विभागाकडे आहे. आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणचे बालरोगतज्ज्ञ मागविता येईल.

श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

एकूण कोरोनाबाधित - ९००७६

एकूण बरे झाले रुग्ण - ८७०००

उपचार घेत असलेले रुग्ण - ९००

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण - २५०००

११ ते १८ वयोगटातील ७५०००

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - ५९

उपजिल्हा रुग्णालय - ०४

बालरोगतज्ज्ञ - ३३

खासगी वैद्यकीय महाविद्यालय - १

बालरोगतज्ज्ञ - १५

वैद्यकीय महाविद्यालयात ९० बेड

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या पेडियाट्रिक विभागात ९० बेड आहेत. एनआयसीयू - १७ बेड, पीआयसीयूमध्ये १० ची व्यवस्था असून, मनुष्यबळ पुरेसे असल्याची माहिती अधिष्ठाता अनिल देशमुख यांनी दिली.