१४ दिवसांत ३३१५ पॉझिटिव्ह, आता समूह संक्रमणाची भीती
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे शक्यतेकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच जिल्ह्यावर पुन्हा संकट ओढावले आहे. ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क आहे, अशा ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याकडे अजूनही काणाडोळा केला जात आहे. याशिवाय होम आयसोलेशनमधील रुग्णांचा बिनधास्त वावरदेखील धोकादायक ठरत असल्यानेच आता समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये संसर्ग वाढणार, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची सूचना राज्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ११ नोव्हेंबरला प्रशासनाला दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करणे आता महागात पडले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला व फेब्रुवारीमध्ये ब्लास्ट झाला. १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान तब्बल ३३१५ कोरोनाग्रस्त व १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तीन दिवसांत एक हजारांवर पॉझिटिव्हची नोंद जिल्ह्यात होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एक टक्का प्रमाणात संसर्ग कोरोनाकाळात झालेला आहे. चाचण्यामध्येही ३५ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्यावाढ करून असिम्प्टमॅटिक रुग्णांना अटकाव करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यास लोकसंख्येच्या प्रमाणात किमान चार हजार चाचण्यांचे लक्ष्यांक देण्यात आलेले असताना, दीड हजारांच्या आतच नमुन्यांचे संकलन केले जात आहे. कोरोनाला कोणीही गंभीरतने घेत नसल्यानेच संसर्ग वाढत आहे.
अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असताना, अमरावती जिल्ह्यात मात्र वाढते प्रमाण असल्यानेच थेट दिल्लीवरून केंद्रीय पथक धडकले. त्यांनीदेखील चाचण्यांची वाढ करण्यासोबत इतरही उपाययोजना सूचविल्या. मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांनी गंभीरतेने दखल घेतली असताना जिल्हा प्रशासनच गंभीर नसल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जिल्ह्यात वाट लागली व कोरोना संसर्गाचा डबल धमाका सुरू झालेला आहे.
------------
हा घटक आहे कोरोनाचा सुपर स्प्रेडर
* छोटे व्यावसायिक : किराणा दुकानदार, भाजीविक्रेता, हॉकर्स, हॉटेल मालक व वेटर्स
* घरगुती सेवा पुरविणारे : मोलकरीण, नळजोडणी व इतर दुरुस्तीची कामे करणारे कारागीर, लाँड्री, पुरोहित आदी.
* वाहतूक व्यवसायातील लोक : मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर, टेम्पोचालक, रिक्षाचालक
* वेगवेगळी कामे करणारे मजूर : हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील ड्रायव्हर, कंडक्टर, सुरक्षा रक्षक, पोलीस, होमगार्ड
---------
रॅन्डम नमुन्यांमध्ये दोन टक्के पॉझिटिव्ह
शिक्षक मतदारसंघ व ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुुकादरम्यान प्रक्रियेतील कर्मचारी व शाळा सुरू करण्याच्या वेळी शिक्षकांचे नमुने तपासणी करण्यात आली. हा एक प्रकारचा रॅन्डम सर्व्हे जर गृहीत धरला, तर यामध्ये किमान दोन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आलेले आहे. समाजात असिम्प्टमॅटिक रुग्णांचा वावर वाढल्यानेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
बॉक्स
‘होम आयसोलेशन’ रुग्णांवर वॉच नाही
जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला. सध्या ५९० कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनमध्ये आहेत. या सुविधेतील एकाही रुग्णाच्या घरासमोर आरोग्य विभागाचे फलक नाही. हे रुग्ण घरातच नव्हे, तर घराबाहेरही वावरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेही कोरोनाचे संसर्गात भर पडली व संपूर्ण कुटुंबेच संसर्गग्रस्त होत आहेत.
बॉक्स
मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी पथके, नंतर ‘जैसे थे’
मंत्रिमहोदयांच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाद्वारे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात २० पथके नियुक्त करण्यात येतात, नंतर मात्र ‘जैसे थे’; असा प्रकार दोन वेळा झाला. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नियमित स्वरूपात पथके ठेवण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनच गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.
--------------
पॉईंटर
सोमवारचे पॉझिटिव्ह : ०००००
आतापर्यंत संक्रमित :००००००००
एकूण संक्रमणमुक्त : ०००००
आतापर्यंत मृत्यू : ०००००००