रिॲलिटी चेक
फोटो पी १० भाकरे
अमरावती: शासन प्रशासनाने कोरोनाच्या तिसर्या लाटेचे सुतोवाच केले आहे. राज्यात १२ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे ४५ रूग्ण आढळून आले आहेत. घाबरून जाण्याची परिस्थिती नसली तरी तो रोखण्यासाठी आजतरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दहाच्या आत आल्याने अनेकांनी मास्कला ‘अलविदा’ केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन डेल्टा प्लसला कसे रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही नाही
शहर पोलिसांकडून दररोज वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या हॉटेल, खाणावळी, बार, पानटपरी व अन्य प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. १० ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास सिग्नलवरील २० पैकी दहा जण विनामास्क होते, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. दोघांनी दपट्टा गुंडाळलेला होता. मास्क नसणाऱ्या तरुणांसह दूधविक्रेत्याला पोलिसांनी हटकले नाही.
पोलिसांचाही मास्क तोंडाखाली
१) राजकमल चौकात तैनातीस असलेल्या वाहतूक पोलिसांनी नीटपणे मास्क घातलेला होता.
२) गर्ल्स हायस्कूल चौकात मंगळवारी दुपारी पुरुष व महिला असे दोन वाहतूक पोलीस तैनातीला होते. त्यातील पुरुष कर्मचाऱ्यांचा मास्क तोंडाखाली होता.
३) काही वाहतूक पोलिसांचा मास्क परस्परांशी बोलताना खाली आला. मात्र, तो काही वेळाने नाकाच्या वर गेला.
///////////
लसीकरणाची गती वाढण्याचे नाव घेईना
लसीकरण स्थिती
वयोगट १८ ते ४४ : १२५१८० / १२४३६
४५ ते ५९ : १८७२३४/ ६५५२५
६० प्लस : १७७२७९/ ८३८५२
/////////////////
मास्कवरील कारवाई सुरूच
‘विनामास्क वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई निरंतर सुरू आहे. याशिवाय महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची पथकेदेखील मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करतात. पोलिसांना पाहताच अनेकांचा हनुवटीवरील मास्क चेहऱ्यावर चढतो. कोरोना संपला, असा गैरसमज असल्याने मास्क वापर कमी झाल्याचे दिसून येते.
- प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा