शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

२० वर्षांनंतर कसे असेल शहर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:11 PM

आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार आहे.

ठळक मुद्देसुधारित प्रारूपास आमसभेची मान्यता : १९३ आरक्षण, ६,५५८ हेक्टर निवासी जागा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार आहे. या सुधारित प्रारूपावर उशिरापर्यंत सभागृहात चर्चा सुरू होती. याला मान्यता देण्यात आल्यानंतर नागरिकांच्या सूचना व हरकती एक महिन्यापर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.सभागृहात शहराच्या सुधारित विकास प्रारूपाचे पॉवर पाइंट पे्रझेटेंशन राज्य शासनाच्या नगर रचना अधिकारी विजया जाधव यांनी केले. सभागृहाची याला मान्यता आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, जोवर या प्रारूपाविषयीची भूमिका व चर्चा स्पष्ट होत नाही तोवर सभागृहात ही पीपीटी दाखवण्यात येऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. महापालिकेची हद्दवाढ ही २००३ पासून झालेली नाही. महापालिकेच्या सध्याच्या डीपीची मुदत ही ३० नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्ठात येणार आहे. त्यानंतरच्या सुधारित प्रारूपास नियोजन प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते. यानंतर एक महिना यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागण्यात येतील, अशी माहिती जाधव यांनी सभागृहाला दिली.नगर रचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा ३० आॅक्टोबर २०१८ रोजी हस्तांतरित केला. या टिपणीमध्ये सुधारणा करता येईल काय, अशी विचारणा प्रशांत वानखडे यांनी केली यात भूसंपादनाचा मुद्दा, आरक्षण विकसित करावे लागणार आहे. शहरातील भुयारी गट योजनादेखील अर्धवट असल्याविषयीची भूीमका चेतन पवार यांनी मांडली. यावर धोरणात्मक चर्चा होऊ द्या, यावर सदस्यांचे एकमत झाले.सध्या शहराचा १९९२ मध्ये मंजूर विकास आराखडा आहे. पहिले ४५४ आरक्षण होते. यापैकी १३६ आरक्षण विकसित झालेत, ९७ अन्य विभागाचे होते. यापैकी काही विभागांनी मागणीच केली नाही, त्यामुळे कमी झाल्याचे जाधव यांनी सांगीतले. सध्याच्या सुधारीत प्रारूपात जमीन वापर नकाशाचा अवलंब झाला आहे. १२ हजार १६५ हेक्टर ३४ आर आरक्षण कुठे द्यायचे, यासाठी शहराचे चार सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आल्याची माहिती विजया जाधव यांनी सभागृहाला दिली.असा आहे चार झोननिहाय एरियाया सुधारित प्रारूपानुसार १२ हजार १६५ हेक्टर ४ झोनमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या झोनमध्ये २,८७६ हेक्टर, दुसºया झोनमध्ये ३,०६८ हेक्टर, तिसºया झोनमध्ये ३,३७६ हेक्टर व चवथ्या झोनमध्ये २,०८२ हेक्टर एरीया राहणार आहे. पहिली टर्म ही २०३१ पर्यंत आरक्षित राहणार आहे. सध्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सहा लाख ४७ हजार ५६ एवढी असल्याची नोंद आहे. ही २०४१ पर्यंत १० लाखांवर जाईल. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार झोननुसार नियोजन करण्यात आल्याचे जाधव यांनी सभागृहाला सांगितले.१०० रूपयांच्या स्टॅम्पवर अन्य विभागांचे बंधपत्रशहरात आधी ५५१ आरक्षणे होती. आता वाढून १९३ झालेली आहेत. यापैकी १७१ महापालिकेची, तर उर्वरित २२ अन्य विभागांची आहेत. या विभागांद्वारा आरक्षित जागेच्या मागणीसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र लेखी घेण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. शहराच्या १९३ आक्षणात बगिच्यासाठी ३१, मैदानासाठी २३, मेडिकलसाठी ३, प्राथमिक शिक्षणासाठी १, भाजी बाजार ११, मटनमार्केट १ यासह अन्य विभागांचे आरक्षण करण्यात आलेले आहेत. यामध्ये न्यायालयाचे आदेशाचे पालन करण्यात आलेले असून काही आरक्षण बदलविण्यात आल्याचे जाधव म्हणाले.