शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर महागडा गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 5:00 AM

कोरोनाने कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरच्या दरवाढीने त्रस्त आहेत. उत्पन्नाचे स्रोतात महागडे सिलिंडर भरून घेेणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी  चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेकांचे रोजगार गेले. हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व काही रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत मोठी दरवाढ झाली.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धूरमुक्त स्वयंपाकघर या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी दरवाढ केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राबविलेल्या उज्ज्वला योजनेसाठी अडसर ठरत आहे. लाभार्थींना मोफत कनेक्शन दिले असले तरी  सिलिंडरची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांनी एवढा महागडा दराचा गॅस कसा भरावा, असा प्रश्न भेडसावत आहे. कोरोनाने कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरच्या दरवाढीने त्रस्त आहेत. उत्पन्नाचे स्रोतात महागडे सिलिंडर भरून घेेणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी  चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेकांचे रोजगार गेले. हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व काही रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत मोठी दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची इंधन जमा करण्याची कटकट मिटली, असे म्हणत नाही तोच गॅस सिलिंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मोलमजुरी करून गॅस सिलिंडर कसा भरून घ्यावा, असा प्रश्न भेडसावत आहे.  परिणामी नाईलाजाने अनेक कुटुंबे पूर्वापार चालत आलेल्या किमान महाग असलेल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कनेक्शन मोफत, सिलिंडर महाग

उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, दर वाढल्याने आता ते परवडेनासे झाले आहे. त्यात रॉकेल नसल्याने स्टोव्हसुद्धा बंद आहे. नाईलाजास्तव चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे.- छबुताई उके, लाभार्थी

गॅस सिलिंडरच्या दरवाढीने चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले. आमच्याकडे दरमहा एक सिलिंडरचा वापर होतो. सरकारने गॅसचे दर कमी करावे.- सविता सहारे, लाभार्थी

अनलॉक झाले असले तरी रोजगार उपलब्ध झालेला नाही. हातमजुरी करून मिळणाऱ्या पैशांत काही बाजूला टाकून त्यातून सिलिंडर आणण्याची स्थिती आता नाही. पैसा शिल्लक पडला की, तजवीज करू. तोपर्यंत लाकडावर स्वयंपाक करणे भाग आहे. सुभद्रा मानकर, लाभार्थी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर