अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षे वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्या संदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. दरम्यान बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्या.
या प्रकरणावरून चर्चा करत असताना त्यांनी राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर आरोप केला की, तुम्ही माझा फोन का रेकॉर्ड केला. यावरून पोलीस ठाण्यात चांगलाच गदारोळ झाला होता. सुमारे २ तास हा हाय वोल्टज ड्रामा सुरु होता. युवती बेपत्ता झाल्यामुळे खासदार नवनीत राणा व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे.
लव्ह जिहाद प्रकरण; अमरावतीत राडा, नवनीत राणांचं पोलीस ठाण्यात रौद्ररुप
दुसरीकडे राजापेठ पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तसेच एका संशयित युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलवले आहे. याचवेळी कुटुंबीयांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आमची मुलगी जिथे कुठे असेल तेथून परत आणून द्यावी. दरम्यान या प्रकरानातील वास्तव जाणून घेण्यासाठी खासदार राणा राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. तेथे कॉल रेकॉर्डिंगवरून त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तू तू मै मै झाली. आपण दलित आहोत त्यामुले आपण माझी कॉल रेकॉर्डिंग करता असा आरोप नवनीत राणा यांनी केला.