फ्लेवर तपासणीसाठी प्रयोगशाळेतअमरावती : अमरावतीकर युवक नशेच्या आहारी जाण्यापूर्वीच हुक्का पेनचा पर्दाफाश झाला आहे. जवाहर गेट परिसरातून हुक्का पेनचा मुद्देमाल एका पित्याच्या सतर्कतेने पोलिसांना जप्त करता आला. दरम्यान, हुक्का पेनसोबत डबीत असलेले फ्लेवर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.आठवीत शिकत असलेला मुलगा लपून झुरका घेत असल्याचे आढळताच वडिलांनी त्याला हटकले. त्याच्याजवळ पेन होता. मात्र, बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तो हुक्का असल्याचे निदर्शनास आले. मुलगा नशेच्या आहारी जाऊ नये, यासाठी ते तडक पोलिसांकडे पोहोचले. हा प्रकार प्रथम गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी ती माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात धाडसत्र राबविले.जवाहर गेट परिसरातील आशिष इलेक्ट्रॉनिक्स या प्रतिष्ठानातून पेनच्या आकाराचे ५५ नग हुक्का गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले. जप्त हुक्का पेनसोबत जप्त बॉटलमधील तरल पदार्थ वेगवेगळ्या फ्लेवरचा होता. हा पदार्थ नशा निर्माण करणारा आहे का, हे तपासून पाहण्यासाठी पोलिसांनी बॉटल प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. हे साहित्य मुंबईहून आणले गेल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.पालकांनी सतर्क असणे गरजेचे आहे. पाल्याच्या स्कूल बॅग जरूर तपासाव्यात. त्यात काही नशाखोरीचे साहित्य तर नाही ना, याची खात्री करावी.- शशिकांत सातव,पोलीस उपायुक्त.उत्पादकापर्यंत पोहोचणार पोलीसआशिष झांबानी यांनी हुक्का पेन मुंबईवरून आणल्याची माहिती दिली आहे. आता पोलीस त्याच्या उत्पादकांपर्यंत पोहोचणार आहेत.
वडिलांच्या सतर्कतेने हुक्का पेनचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 10:37 PM
अमरावतीकर युवक नशेच्या आहारी जाण्यापूर्वीच हुक्का पेनचा पर्दाफाश झाला आहे. जवाहर गेट परिसरातून हुक्का पेनचा मुद्देमाल एका पित्याच्या सतर्कतेने पोलिसांना जप्त करता आला. दरम्यान, हुक्का पेनसोबत डबीत असलेले फ्लेवर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
ठळक मुद्देमुलगा नशेच्या आहारी न जाण्यासाठी पाऊल