फोटो पी २५ पुसली
पान २ चे लिड
वरूड-शेंदूरजनाघाट : येथून जवळच असलेल्या पुसली प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर आले आहेत. ते मासे कशामुळे दगावले, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. प्रकल्पाच्या पाण्याचे नमुने अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत तेथील पाण्याचा पिण्यासाठी होणारा वापर बंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील पुसली प्रकल्प परिसरात अचानक शेकडो मासे मरून पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मासे प्रकल्पाच्या काठावर येत आहेत. ही माहिती मिळताच शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे काही नगरसेवक व पाणीपुरवठा अभियंत्यांनी लगेच प्रकल्पाची पाहणी केली व शेंदूरजनाघाटला होत असलेला पाणीपुरवठा थांबविला. फिल्टर प्लांट साफ करण्याचे निर्देेशदेखील दिले. शेंदूरजनाघाट नगर परिषदेला पुसली प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पाणीपुरवठा बंद केला असून, चौकशी सुरू आहे. तेव्हा मासे कशामुळे मरण पावले, याचे नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुसली धरणावरील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागठाणा धरण, जामतळा येथील विहीर तसेच बोअरने पाणीपुरवठा सुरू आहे.
कोट
पुसली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तेथील पाण्याचे नमुने तपासणीकरिता अमरावतीला पाठविले आहेत. अद्याप अहवाल अप्राप्त आहे.
- रश्मी बारस्कर, पाणीपुरवठा अभियंता, नगर परिषद, शेंदूरजनाघाट