अमरावती: जंगल आणि पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्या गोळा करण्यासाठी रविवारी सकाळी काही युवक एकवटले. तब्बल दोन ते तीन कटले प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. हा अभिनव उपक्रम जैववैविविधता दिनाचे औचित्य साधत ‘वार’ संस्थेच्या पुढाकाराने नजीकच्या छत्री तलात्च्या जंगल परिसरात राबविण्यात आला.
जंगलात आंबटशौकीन पार्ट्या करतात. सोबतच्या प्लास्टिक व दारूच्या बाटल्या तेथेच टाकून देतात. त्या नष्ट होत नाहीत व पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पावसाळ्यात जंगलात रोपटे उगवतात. यावेळी प्लास्टिक बाटल्या अडचणीच्या ठरतात. हीच बाब हेरून रविवारी सकाळी जैववैविविधता दिनाचे औचित्य साधत ‘वार’ संस्थेच्या युवकांनी छत्री तलाव जंगल परिसरात साफसफाई अभियान राबविले. दोन ते तीन घंटीकटले प्लास्टिक बाटल्या गोळा करून कचरा निर्मूलन प्रकल्पस्थळी विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या.
वाइल्ड लाईफ अवरेनेस रिसर्च अंड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटी (वार) यांच्या पुढाकारात वनविभाग, महापालिका, विश्वरूप यांची चमू आदींनी छत्री तलाव जंगल परिसराची साफसफाई करण्यात आली. वार संस्थेच्यावतीने यावर्षी कोविड नियमांचे पालन करीत हे अभियान राबविण्यात आले. गोळा केलेले प्लास्टिक उचलून नेण्यासाठी महापालिकेचे विशेष सहकार्य मिळाले.
अभियानात वनविभागाचे वडाळी वर्तुळ अधिकारी श्याम देशमुख, व्ही.बी. चोले, पी.एस. खाडे, जी.के. मसे, वनमजूर ओंकार भुरे, राजू पिंजरकर, राजू कठाळे, मोहन चौधरी, राहुल शनवारे, आकाश वानखेडे, संघर्ष तायडे, डॉ. मधुरा अंजनकर, ऋतिका चौधरी, हेमल शहा, मानसी नाकोड, सौरभ डोळे, श्यामल वहाड, रोशन सिराम, किरण ढोक, मंजुरी हरणे, प्रांजली खासगे, डाॅ. निकिता, डाॅ. स्वाती, वार संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे, प्रशांत भुरे, निशांत निंभोरकर, ओमप्रकाश शर्मा, अशोक श्रीवास, लवली सिंग, मूर्तजा, चेतन मालोकार, प्रतीक ढगे, सौरभ वानखेडे आदींचा सहभाग होता.
--------------