लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अकोला महामार्गावरील वाय पॉर्इंटनजीक एका नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन फेकण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत महापालिकेने सर्व इंजेक्शन गोळा करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली. मात्र, हे कुणी फेकले, ते अद्याप कळू शकलेले नाही.बडनेरा ते अकोला मार्गावर पाळा फाट्यासमोरील नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन अज्ञातांनी फेकले होते. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ही अत्यंत गंभीर बाब होती. वापरलेले इंजेक्शन मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग पसरवू शकतात. यापासून विविध आजारदेखील वाढू शकतात.‘लोकमत’ने सदर वृत्त प्रकाशित केल्यानंतर याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने याची दखल घेत नाल्यातील फेकलेले इंजेक्शन ताब्यात घेतले व दुर्गापूर मार्गावरील बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रकल्पात नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसह स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड हे इंजेक्शन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. महापालिकेने जंतुसंसर्ग पसरू नये, यासाठीची जी कारवाई करायची, ती केली; मात्र निष्काळजीपणे असे कृत्य करणाºयाचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. त्याला शोधणे शहर तसेच ग्रामीण भागातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.बायोमेडिकल वेस्ट कुठेही टाकून देणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याची दखल प्रशासनाने घेतलीच पाहिजे. प्रशासनाने आता हा साठा निष्काळजीपणाने उघड्यावर फेकणाºयाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई निश्चित करावी, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
नाल्यात फेकलेले शेकडो इंजेक्शन केले नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 5:00 AM
बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसह स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड हे इंजेक्शन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. महापालिकेने जंतुसंसर्ग पसरू नये, यासाठीची जी कारवाई करायची, ती केली; मात्र निष्काळजीपणे असे कृत्य करणाºयाचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. त्याला शोधणे शहर तसेच ग्रामीण भागातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : ४८ तासांहून अधिक वेळ साठा पडून