अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बहिरम यात्रेतील गर्दीचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड रविवारच्या गर्दीने तोडलेत. यात्रेत साडेचार लाखांवर नागरिकांची ही गर्दी अंदाज लावण्यापलीकडची ठरली.सकाळी ११.३० ते १२.३० पासूनच बहिरमबाबाच्या दर्शनाकरिता मंदिरावर भक्तांची एकच गर्दी उसळली. लांबच्या लांब रांगा लागल्यात. भक्तांचीही एकसारखी गर्दी तब्बल ४.३० वाजेपर्यंत राहिली. महिला व पुरूष यांचीही एकत्रित गर्दी मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. लाखो भाविकांनी बहिरमबाबाचे दर्शन घेतले. मंदिरावरील आजच्या या गर्दीने बहिरम यात्रेतील गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडल्याचे मंदिर व्यवस्थापक सुनील ठाकरे, सहव्यवस्थापक सचिन ठाकरे यांनी स्पष्ट केले. यापेक्षा दुप्पट गर्दी यात्रेत खाली असल्याचेही ते म्हणाले.वृत्त लिहिस्तोवरही मंदिरावरील भक्तांच्या रांगा, गर्दी खंडलेली नव्हती. पण मंदिरावर यात्रेकरूंचीही गर्दी होण्यापूर्वीच सकाळी १० वाजेपर्यंत आदिवासींनी बहिरमबुवाचे दशर््न घेतले. नवसाकरिता आणलेल्या बोकडांची पूजाही त्यांनी मंदिरावर केली. बहिरमबुवाच्या साक्षीने बोकडाची पूजा केल्यानंतर ते बोकूड त्यांनी बहिरमबाबाला अर्पण केले नाही. मंदिरावर सोडले नाही तर पूजेनंतर ते बोकूड मंदिरावरून खाली नेले. रितीरिवाजाप्रमाणे ते बोकूड कापून शिजविले आणि कुटुंबासमवेत आलेल्या नातेवाईकांसह, आमंत्रितांसह जेवण केले. सकाळी दहा वाजेपर्यंत अशाप्रकारे आदिवासींकडून सात बोकडांची पूजा करण्यात आली.बहिरम यात्रेत दहा ते अकरा अधिकृत पार्किंग आहेत. यात्रेतील हे सर्व पार्किंग फुल्ल झाले होते. गाडी लावायला पार्किंगमध्ये जागा नव्हती. त्यामुळे परतवडा रोडने, कारंजा बहिरम रोडने, बोदड रोडने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.यात्रेत जेवण देणाºयांची संख्या दरवर्षीच अधिक असते किंबहुना बहिरम यात्रेतील जेवणाच्या आमंत्रणाची वाट बघितली जाते. अशातच रविवार, २७ जानेवारीला यात्रेत स्वयंपाक करून रोडग्याच्या जेवणाचे आमंत्रण देणारे सर्वाधिक राहिलेत. याकरिता अनेकांनी २६ जानेवारीलाच रात्री यात्रेत पोहचून जागा ताब्यात घेतल्यात. रविवारला अनेकांना स्वयंपाक करायला जागाही मिळाल्या नाहीत. कोपºया कोपºयातील जागाही शिल्लक न राहल्यामुळे अनेकांनी दूरवर रोडच्या कडेला व शेतांमध्ये जिथे जागा मिळेल तिथे अखेर स्वयंपाक बनविला.या गर्दीत अनेक आमंत्रिताना जेवणाचे ठिकाण न दिल्यामुळे ते जेवण न करताच यात्रेतून परतलेत. गर्दीत अनेक कुटुंबांची ताटातूट झाली. कुठे आई, कुठे मुलगा, कुठे पती तर कुठे पत्नी या गर्दीत दिसेनासे झाले होते. हरवले होते. मंदिरावरच ७ ते ८ लोक हरवलेत. हरवलेल्यांची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे दिली गेली. लोकांनी अवधीनंतर शोधाशोध केल्यानंतर हरवलेले परत एकमेकांना भेटलेत.
बहिरम यात्रेत साडेचार लाख नागरिक, रविवारी गर्दीचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:11 PM
बहिरम यात्रेतील गर्दीचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड रविवारच्या गर्दीने तोडलेत. यात्रेत साडेचार लाखांवर नागरिकांची ही गर्दी अंदाज लावण्यापलीकडची ठरली.
ठळक मुद्देगर्दीत कुटुंबाची ताटातूट : कुठे आई, कुठे मुलगा, कुठे पत्नी तर कुठे पती दिसेनासे झालेत