शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

राणा दाम्पत्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो कार्यकत्यांविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:50 PM

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध शहर कोतवाली, नांदगाव पेठ, राजापेठ व गाडगेनगर पोलिसांनी विनापरवानगी रॅली, वाहतुकीला खोळंबा, विनापरवानगी जमाव जमविल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून २८ मे रोजी रात्री हे गुन्हे दाखल करण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

रहाटगाव, पंचवटी, इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक व राजापेठेत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी डीजेच्या आवाजाने ध्वनिमर्यादा ओलांडली. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम २९१, ३४१, १४३ व मपोकाच्या १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. राजापेठ पोलिसांनीदेखील राणा समर्थकांविरुद्ध भादंविचे कलम १८८, ३४१ व मपोकाच्या १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. सोबतच शहर कोतवाली व नांदगाव पेठ पोलिसांनीदेखील युवा स्वाभिमानच्या शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाPoliceपोलिस