शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:54 AM

दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे.

ठळक मुद्देदुग्धोत्पादनाला फटका : हिरवे वैरण नसल्याने पशुपालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो.त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. जिल्ह्यात दृष्काळी स्थिती असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दृष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस २० लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर ३ किलो चारा तर मोठया पशुनाला ४० लिटर पाणी अन ६ किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे जिल्हाभरातील ५ लाख १२ हजार ६० मोठ्या दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाºयावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाची भूक वाळलेल्या चाºयावर भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन १० टक्के घटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.१६ हजार हेक्टरवर गाळपेर क्षेत्रपशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात १६,११५ हेक्टरवर गाळपेर क्षेत्र आहे. वैरणविकास योजनेतून बहुवार्षिक थोंबे, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारी बियाणे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका बियाणे, पशुधनाचे वैरणासाठी २४ हजार ५०० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.दृष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पशुधनाला पुरेसे पाणी व चारा आवश्यक आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाला पुरेल एवढा वाळलेला चारा सध्या जिल्ह्यात आहे. हिरवा चाºयाअभावी दूध उत्पादनात १० टक्के घट झाली. वैरण विकास योजनेतून उपाययोजना केल्या आहेत.- डॉ विजय राहाटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीअमरावती ३७ हजार ५१३, अचलपूर ४५०३३, अंजनगाव सुर्जी २६०२९, भातकुली २५९९९, चिखलदरा ४९४१०, चांदूर रेल्वे २६००३, चांदूर बाजार ३५१७०, धारणी ६३९११, धामणगाव रेल्वे ३१२५९, दर्यापूर ३३३२९, मोर्शी ३८२१८, नांदगाव खंडेश्वर ३२०३२, तिवसा २६१३८ आणि वरूड ४२०१६ असे एकूण ५ लाख १२ हजार ६० पशुधनाची संख्या १९ वी पशुगणना २०१२ नुसार आहे.