अमरावती : कोळी महादेव जमातीला लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी पाच वाजता दोन उपोषणकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या टेरेसवर धाव घेतली व खाली उडी मारून आत्महत्येचा इशारा दिला. त्याच वेळी काही कार्यकर्त्यांनी आवारात ठिय्या देत प्रचंड नारेबाजी केली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
शासन प्रशासनाद्वारे कोणतीही दखल घेण्यात न आल्याने उपोषणकर्त्यांसह कार्यकर्ते २१ व्या दिवशी संतापले. यावेळी दोन्ही उपोषणकर्त्यांनी तिसऱ्या माळ्यावरील टेरेसवर घाव घेतली व मागण्या मान्य न केल्यास खाली उडी मारण्याची धमकी दिली. विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेयसह उपायुक्त, काही अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरित भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि समजूत घालत त्यांना खाली उतरविले.