लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : दानपेटीत लाखो रुपये टाकणारे धनिक त्याच देवळाच्या पायरीवर बसलेल्या भुकेल्यांकडे पाहतसुद्धा नाहीत. त्या दानपेटीत दान केल्यापेक्षा देवळाच्या पायरीवर बसलेल्या भुकेल्याला अन्नदान करा. त्यामुळेच खरा देव नवसाला पावणार, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.शहरातील एका सभागृहात गाडगेबाबा रोटी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी शंकर मोहनलाल पुरोहित, नगरसेवक नजीर कुरेशी, नितीन कोरडे, सरदार खान, मधुसूदन कुलथे, विलास पंचभाई यांची उपस्थिती होती. रोटी अभियानांतर्गत शहरातील ४८ गरजू लोकांना आता दररोज दोन्ही वेळ जेवण मिळणार आहे. भुकेल्यांना अन्न या गाडगेबाबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार बच्चू कडू यांनी गावोगावी गाडगेबाबा रोटी अभियानाची सुरुवात केली आहे. तालुक्यात सर्वप्रथम वणी बेलखेडा येथे या रोटी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. वणी येथील रोटी अभियानात १२ गरीब व हतबल लोकांना घरपोच दोन्ही वेळचे जेवण दिले जात आहे तसेच बेलोरा व बोराळा येथे गाडगेबाबा रोटी अभियान सुरू आहे.एकीकडे घरोघरी होणाऱ्या मंगलप्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. दुसरीकडे गोरगरिबांना एक वेळचे अन्नसुद्धा मिळत नाही. यामुळे या रोटी अभियानाची गरज प्रत्येक गावात आहे. याकरिता सर्वांनी जात, धर्म, पंथाचे सोंग बाजूला सारून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कडू म्हणाले.स्थानिक रहिवासी गणेश पुरोहित यांच्या पुढाकारातून शहरात या रोटी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. याकरिता बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील दानशूर शंकर मोहनलाल पुरोहित यांनी या रोटी अभियानाचा एक महिन्याच्या संपूर्ण खर्च देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे ४८ लोकांची दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.म्हणून रोटी अभियानाची गरजभविष्यात कोणीही उपाशी राहू नये, याकरिता गावोगावी हे रोटी अभियान सुरू करणे गरजेचे असल्याचे आमदार कडू यांनी संगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक दानदात्यांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे. १८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णांची नेत्रतपासणी, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करून उपचार करण्यात आले. कार्यक्रमाला वणीचे सरपंच सूरज चौहान, उपसरपंच मंगेश देशमुख, रवि सूर्यवंशी, अनिल पालीवाल, दीपक भोंगडेसह शेकडो नागरिक उपस्थित होते. संचालन नगरसेवक सचिन खुळे व आभार प्रदर्शन मुजफ्फर हुसेन यांनी केले.
पेटीत टाकलेल्या दानापेक्षा भुकेल्यांना अन्नदान गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:00 AM
शहरातील एका सभागृहात गाडगेबाबा रोटी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी शंकर मोहनलाल पुरोहित, नगरसेवक नजीर कुरेशी, नितीन कोरडे, सरदार खान, मधुसूदन कुलथे, विलास पंचभाई यांची उपस्थिती होती. रोटी अभियानांतर्गत शहरातील ४८ गरजू लोकांना आता दररोज दोन्ही वेळ जेवण मिळणार आहे.
ठळक मुद्देबच्चू कडू : ४८ गरजूंना रोटी अभियानातून मिळणार जेवण