आयुक्तांचा लक्षवेध : प्रशासकीय सरंजामशाही मोडीत काढण्याचे आव्हानअमरावती : निवडणूक काळात आमच्या बदल्या केल्यात. याबद्दल आक्षेप नाहीच. तथापि कर्मचाऱ्यांमधील गोल्डन गँगवर आयुक्तांनी हंटर चालवून प्रशासकीय चुणूक दाखवाव, अशी आग्रही अपेक्षा महापालिका कर्मचारीमधून व्यक्त करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत खांदेपालट करण्याचे धाडस आयुक्त हेमंत पवार यांनी ९ फेब्रुवारीला आयुक्तांनी दाखवावे, असे उघडपणे बोलले जात आहे. २२ कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय खांदेपालट केला. यात वसुली लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकांचा समावेश होता. बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये जसे वर्षानुवर्षे एकाच खुर्चीला चिकटलेले तर काहीजण नवखेही होते. काहीतर लगेचच राजकीय आदेशाला गेलेत. काहींनीतर राज्य निवडणूक आयोगाचा २५ डिसेंबर रणाचा आदेश दाखवत आचारसंहितेच्या काळात निवडणुकांशी संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांची बदली करताना राज्य निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे सांगून आयुक्तांनी राबविलेली बदली प्रक्रियेला ‘तात्पूर्ती कारवाई असे नामनिधानही दिले. त्या पार्श्वभूमीवर थोडी नरमाईची भूमिका घेत, ठिक आहे ! आमची बदली केली तरी चालेल. मात्र आयुक्तांनी एडीटीपी, लेखा परीक्षण, अतिक्रमण, बाजार परवाना, स्वच्छतेसह वर्षोनुवर्षे, वसुली, टेबलला चिटकून असणाऱ्या ‘खास’ कर्मचाऱ्यांची बदली करून दाखवावी, तेव्हाच आमचे आयुक्त राजकीय दबावाला बळी पडत नाहीत, हे पुराव्यानिशी सिद्ध होईल, अशी भूमिका अनेक कर्मचारी महापालिकेत मांडू लागले आहेत. महापालिकेत वर्षेनुवर्षे असलेल्या विशिष्ट राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला जात कित्येक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून लाभाच्या टेबलवर कार्यरत आहेत. त्यासंबंधित कर्मचाऱ्यांचा एकंदरीत अर्थपूर्ण व्यवहार आणि राजकीय लागेबांध्यांचा आयुक्तांनी आढावा घ्यावा व ही चेनब्रेक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)प्रभारीही झालेत साहेबएकाच विशिष्ट पदाचा पदभार वर्षोनुवर्षांपासून एकाच व्यक्तीकडे असल्याने अनेक प्रभारींनी मनसबदारी चालविली आहे. हे प्रभारी इतके जुळलेत की, आपणाकडे या पदाचा तात्पुरता प्रभार असल्याचे अनेकजण साफ विसरलेत. प्रशासकीय एटीकेट्सन पाळता क्लास वन अधिकाऱ्यांनाही स्वत:च्या समकक्ष समंजसपणाची नवी सरंजामशाही महापालिकेत जन्माला आली आहे. एकाच टेबलवर वर्षोनुवर्षांपासून असल्यानंतरही प्रशासनाने आपल्याला हातही लावला नाही. किंबहुना कुणाचीही तशी हिम्मत नाही, अशा आविर्भावात अनेक प्रभारी कर्मचारी ‘अधिकारी’समान वागत आहेत. लेखा, एडीटीपीत अधिक चिपकूलेखा आणि एडीटीपीसह स्वच्छता विभागामध्ये अन्य विभागांच्या तुलनेत अधिक चिपकू आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखवत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी यंत्रणेला दिलेले आव्हान, हे एक प्रतिनिीधक उदाहरण असले तरी बहुतांश विभागात बदली होऊनही रुजू न होणारे अनेक महाभाग कर्मचारी या महापालिकेत आहेत. जीएडीकडून याबाबतचा आढावा घेतल्यास रुजूू न होणाऱ्या बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांचा आकडा आयुक्तांना कळू शकेल.
‘त्यांच्या’वरही चालवावा हंटर !
By admin | Published: February 13, 2017 12:12 AM