पान २ ची सेकंड लिड एकत्र
पती दोन जागी, पत्नी एका जागी विजयी :
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जावरा ग्रामपंचायतीत सात सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत पती दोन जागांवर विजयी तर, पत्नीने एका जागेवर विजय मिळविला. एकाच ग्रामपंचायतीत पती-पत्नीने तीन जागा पटकाविण्याचा बहुमान या दाम्पत्याला मिळाला. प्रशांत ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच त्यांच्या पत्नी वृषाली प्रशांत ठाकरे या प्रभाग क्रमांक एकमधून निवडणूक रिंगणात होत्या. प्रशांत ठाकरे यांनी यापूर्वी जावरा ग्रामपंचायतीचे पाच वर्षे उपसरपंचपद व पाच वर्ष सरपंचपद भूषविले आहे. या निवडणुकीत प्रशांत ठाकरे यांच्या ग्रामविकास पॅनेलने सातपैकी सहा जागा पटकाविल्या. या पॅनेलमधील अनिता नारनवरे, प्रतिभा मोहोड, जयश्री पालेकर हे उमेदवार विजयी झाले. तसेच प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनेलमधील सुनील झाकर्डे विजयी झाले.
--------------
अंजनसिंगी ग्रामपंचायतवर ग्रामसेवा आघाडीचा विजय
अंजनसिंगी : स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिवसेनाप्रणित ग्रामसेवा आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये रुपाली गायकवाड, वैशाली जुवारे, सीमा तालन, अवधूत दिवे, प्रतिभा मेहकरे, सविता माळोदे, बंडू काळे, मालू टिकले, प्रमिला वानखडे, तर भाजपप्रणित परिवर्तन पॅनेलचे रवींद्र बिजवे, भोजराज हिवसे हे निवडून आलेत.
-------
फोटो पी २१ आष्टी
आष्टीत सासु, सुनेने मारली बाजी
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथे परिवर्तन पॅनेलच्या सासु व सुन विजयी झाल्या. सून बिनविरोध, तर सासुने निवडणुकीत सहा मतांनी विजय प्राप्त केला. येथे महाविकास पॅनेलने सर्वाधिक सहा उमेदवार निवडून आणले आहे. ११ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये सुन विजया ठाकरे, त्यांची सासु लता ठाकरे, दिलीप जवंजाळ, दीपाली सके, सुमित्रा इंगळे, संजय खर्चान, दिनेश डवले, मुक्ता लोखंडे निवडून आले. परिवर्तन पॅनलमधुन राम खरबडे, अ. रमीज अ. शकील नायक, लता ठाकरे, कांचन वैद्य, विजया ठाकरे यांनी विजय मिळविला.
------------------------------------