- गजानन मोहोडअमरावती : दिवंगत व्यक्तीचे पिंडरुपाने स्मरण करण्याची पंरपरा आहे. मोक्षाच्या दिशेने त्यांचा प्रवास व्हावा, यासाठी पितृपक्षातील त्याच तिथीस त्यांचे श्राद्ध करण्यात येते. मात्र, ही उपचारात्मक कृती करीत वास्तव फाऊंडेशनद्वारा देशभºयातील पत्नीपीडित पुरुषांनी रविवारी दुपारी नाशिक येथे पत्नीसोबतच्या आपल्या मृत नात्याचे व कायद्यातील जाचक तरतुदीचे निषेध करीत प्रतिकात्मक पिंडदान केले. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील काही पुरुष सहभागी होते.
पत्नीसोबत विभक्त झालेले अथवा घटस्फोट घेतलेले अनेक पुरुष समाजात आहेत. केवळ न्यायालयाने न्यायदानास किंवा निकालास विलंब केल्यामुळे मृत झालेल्या वैवाहिक नातेसंबंधात अडकून आहेत. काहींना तर घटस्फोट झाल्यावरही पती-पत्नीचे नाते कायमचे संपल्याचे भावनिकदृट्या स्वीकारता आलेले नाही. कुठलीही चूक नसताना लग्न मोडताना बघून ही मंडळी गोंधळून गेलेली आहे. आयुष्यभर सुखी संसाराचे स्वप्न पाहिले असताना मुलीकडून नव्या जबाबदारीशी जुळविता न आल्याने किंवा अन्य दुसºयाशी लग्न करण्याची इच्छा असल्याने याशिवाय अन्य कारणांनी खोट्या दिवाणी अन् फौजदारी व कौंटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यांमध्ये अनेक पुरुष अडकल्याचे वास्तव आहे.
ज्या पुरुषांनी लग्नाची चिरकाल टिकणारी रेशमगाठ बांधली मात्र, नाते हे अचानक संपुष्टात आल्यामुळे नैराष्य आले आहे. अशांना ही पिंडदानाची कृती विरेचकासारखी मदत करते. त्यांच्या मते भूतकाळापासून सुटका होत एक कोºया पाटीवर नव्या आयुष्याची सरुवात करण्याची ही संकल्पना असल्याचे हे पत्नीपीडित पुरुष मानतात. वेदशास्त्रीय व शास्त्रीय आधार आहे का?धार्मिक विधीपेक्षा हा एक उपचारात्मक विधी आहे. हिंदू धर्म घटस्फोटासदेखील संमती देत नाही, त्यांचे नातेसंबंध केवळ कायदेशीरदृट्या आले आहेत. धार्मिक वेदशास्त्रानुसार नाही, असे या पुरुषांना वाटते. त्यामुळे त्या पुरुषांसाठी हा स्थित्यंतराचा क्षण आहे. यामध्ये वेदशास्त्राचे महत्त्व काय आहे, याचा विचार न करता त्यांना नव्याने जीवनाची सुरुवात करता येणार असल्याचे वास्तव फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे.
कायद्यातील जाचक तरतुदींना आहुतीया उपचारात्मक पिंडदान कार्यक्रमात कायद्यातील जाचक तरतुदीचे उच्चार करून प्रतिकात्मक आहुती देण्यात आली. नागपूर येथे पार पडलेल्या ‘सेव्ह इंडियन फॅमिली’ समूहातील स्वयंसेवी संस्थांच्या ११ व्या राष्ट्रीय पुरुष अधिकार संमेलनात आपापल्या पत्नींसोबतच्या मृत नातेसंबंधाचे पिंडदान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार अमावस्येपूर्वीच्या श्राद्ध कालावधीत २२ सप्टेंबरला नाशिक येथे पिंडदान विधी करण्याचे ठरले होते, असे वास्तव फाऊंडेशनने स्पष्ट केले.
समाजात पुरुषांवरदेखील अन्याय होतो. याषियीची जागृती आम्ही करीत आहो. कौंटुबिक हिंसाचाराची जी खोटी प्रकरणे सुरू आहेत. त्याचे पिंडदान करून निषेध केला. यामध्ये देशभºयातील पीडित पुरुष सहभागी होते. पुढील पिंडदान कौंडण्यपूरला करणार आहोत- अमित देशपांडे, अध्यक्ष, वास्तव फाऊंडेशन