अमरावती : हुंड्याची मागणी, शारीरिक छळाच्या प्रकरणात पती व नणंदेची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश
पहिले प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (अमरावती) देशपांडे
दिले. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ४९८ अ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रीती नीलेश तिरपुडे या प्रकरणात अर्जदार होत्या. त्या लोणी टाकळी येथे शिक्षक आहेत, तर पती
नीलेश उत्तमराव तिरपुडे जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये त्यांचे लग्न झाले. दोन महिन्यांतच पती नीलेश, सासू शकुंतला, नणंद निशा रवींद्र मेश्राम यांनी प्रीती यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. नीलेश यांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी व कार घेण्यासाठी मद्यपान करून तीन लाख रुपयांची मागणी करायचा आणिअमानुष छळ करायचा. २०१६ मध्ये मुलगी झाल्याच्या कारणावरून त्यांनी प्रीतीला मारहाण केली. प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपींकडून संजय प्रजापती व दीपक चौधरी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
सुनावणीदरम्यान या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या शकुंतला उत्तमराव तिरपुडे यांचा मृत्यू
झाला. याबाबत प्रीतीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.