लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नपुंसक पतीच्या भावाने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार मुजफ्फरपुरा येथील एका विवाहितेने नागपुरी गेट पोलिसांत केली आहे. पतीसह अन्य आरोपींनी पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवले, असेही तक्रारीत म्हटले आहे. २९ एप्रिल ते २० आॅगस्टपर्यंत हा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी मो. आबिद अ. गणी, मो. जावेद अ. गणी, अ. गणी, मो. जुनेद अ. गणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.तक्रारीनुसार, या तरुणीचा विवाह २९ एप्रिल २०१८ रोजी अमरावती येथे पार पडला. मो. अब्दुल हा नपुंसक असल्याची माहिती सासरच्या मंडळीने लपवून ठेवली. लग्नानंतर ही बाब उघड झाली. सासूने गुंगीच्या गोळ्या दिल्यात. ही विवाहिता त्याच्या अमलात असताना आरोपी भासरा मो. जावेद याने तिच्यावर अत्याचार केला. पतीसह सासरा, भासरा, सासू व दिराने शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ व मारहाण केली, शिवाय लग्नात मिळालेल्या भेटवस्तू वारंवार मागूनही दिल्या नाहीत. या त्रासाला कंटाळून विवाहितेने २९ आॅगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) एफ, जे, एन, ३२८, ४९८ (अ), ४०६, ३२३, ५०६, ३४ भादुंवअन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश खुळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.