(फोटो/मेल)
अमरावती : अमृत अभियान टप्पा एक अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी महापालिकेचा ४.०९ कोटी रुपये वाटा देणे आहे. त्यासंदर्भात उपलब्ध निधीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन कोटी रुपये त्वरित देण्याचे निर्देश महापौरांनी सोमवारी दिले.
महापौरांनी भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या दस्तुरनगर प्रभागातील पूजा कॉलनी, फरशीस्टॉप परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नगरसेविका पद्मजा कौंडण्य, अनिता राज, नगरसेवक बलदेव बजाज, कार्यकारी अभियंता-२ सुहास चव्हाण, भुयारी गटार योजनेचे उपअभियंता शिवा कुलट, अभियंता मंगेश कडू, विजय कौंडण्य, लखनराज, प्रवीण कौंडण्य उपस्थित होते. भुयारी गटारमुळे रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. सदर कामाबाबत पाहणी करताना महापौरांनी नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्वरित काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले, तर महापालिका प्रशासनाला सदर काम तात्काळ करून घेण्याबाबत सुचना दिल्या. नागरिकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवून सदर काम पूर्णत्वास न्यावे, असे महापौर गावंडे म्हणाले.