शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

आयसीयू, ऑक्सिजन बेडची मारामार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 5:00 AM

जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० कोरोनाग्रस्तांची नोंद अलीकडे होत आहे, यात सध्या ८ ते १२ टक्के व फेब्रुवारी व मार्च महिन्यात सरासरी ३० ते ४० टक्के या प्रमाणात पॉझिटिव्हिटीची नोंद झाली होती. आता कोरोनाग्रस्तांचा ग्राफ काहीसा माघारला आहे. मात्र, लगतच्या नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात नवे कोरोनाग्रस्त व संक्रमितांचे मृत्यू यांचे रोज नवे उच्चांक स्थापन होत आहेत.

ठळक मुद्देनागपूरसह अन्य जिल्ह्यांंतील रुग्ण दाखल जीव वाचणे महत्त्वाचे, प्रशासनाची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लगतच्या सर्व जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल होत आहेत.  जीव वाचणे महत्त्वाचा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक शासकीय व २३ खासगी कोविड हॉस्पिटलचे आयसीयूचे ८२ टक्के व ऑक्सिजनचे ६७ टक्के बेड व्याप्त आहेत. अशीच स्थिती राहिल्यास एक-दोन दिवसांत आयसीयू व ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवेल. जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० कोरोनाग्रस्तांची नोंद अलीकडे होत आहे, यात सध्या ८ ते १२ टक्के व फेब्रुवारी व मार्च महिन्यात सरासरी ३० ते ४० टक्के या प्रमाणात पॉझिटिव्हिटीची नोंद झाली होती. आता कोरोनाग्रस्तांचा ग्राफ काहीसा माघारला आहे. मात्र, लगतच्या नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात नवे कोरोनाग्रस्त व संक्रमितांचे मृत्यू यांचे रोज नवे उच्चांक स्थापन होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरच आव्हान उभे ठाकले आहे. तात्काळ आरोग्य सेवा मिळणे महत्त्वाचे असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची धाव अमरावती जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी शहरात ओस पडलेले कोविड हॉस्पिटल सध्या हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.नागपूर व अन्य जिल्ह्यांतील कोरोनाग्रस्त जिल्ह्यात उपचारार्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. याशिवाय काही प्रमाणात औषधांचाही तुटवडा निर्माण होत आहे. यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होत आहे. अन्य जिल्ह्यातल्या रुग्णांनी येथील आयसीयू व ऑक्सिजन बेड व्यापले असताना जिल्ह्यात संसर्ग वाढल्यास येथील रुग्णांनी कोठे जावे, हा प्रश्न विचारला जात आहे. 

१० रुग्णालयांत आयसीयू हाऊसफुल्लजिल्ह्यात २३ खासगी व एक शासकीय कोविड रुग्णालय आहे. यापैकी १० खासगी रुग्णालयांतील १२९ आयसीयू बेड हाउसफुल्ल स्थिती आहे. याशिवाय पाच रुग्णालयांत फक्त प्रत्येकी एक व एका हॉस्पिटलमध्ये दोन बेड रिक्त आहेत. या सर्व  रुग्णालयांमध्ये ४०९ आयसीयू बेड संख्या असताना ३३१ बेड व्याप्त झाल्यामुळे केवळ ७५ आयसीयू बेड शिल्लक आहेत.

सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड फुल्लशहरातील सहा रुग्णालयांतील ६२ ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त असल्याने येथेही हाऊसफुल्लची स्थिती उद्भवली आहे. एकूण २४ रुग्णालयांत ६६९ ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहेत. यापैकी सद्यस्थितीत २२५ शिल्लक आहेत. यामध्ये पीडीएमएमसीमधील ५८ बेडचा समावेश आहे.

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे?जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीतील जिल्हा कोविड रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. येथे ४५० बेडची सुविधा आहे. यात आयसीयूमधील ८३ पैकी ६४  बेड रुग्णांनी व्यापले. याशिवाय १४४ ऑक्सिजन बेडपैकी १४१ रुग्णांनी व्यापले आहेत. यात बहुतांश रुग्ण नागपूर येथील असल्याने जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूरच्या रुग्णांनी अर्धेअधिक रुग्णालय व्यापलेनागपूर जिल्ह्यात कोरोना विस्फोट झाल्याने तेथे बेड कमी पडत आहेत. त्यामुळे तेथील ५० हून अधिक रुग्ण येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय २३ खासगी रुग्णालयातील अर्धेअधिक बेड सध्या नागपूरच्या रुग्णांनी व्यापले. वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ तसेच मध्यप्रदेशातील रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत नागपूरचे १५० वर रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. रुग्णालयांना २५ टक्के बेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. - शैलेश नवाल जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल