लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मागील ८० वर्षांपासून शहरात सुरू असलेली मारबत प्रथेची परंपरा मंगळवारी युवकांनी हाती घेत दोन ठिकाणावरून मारबत निघाली. ‘रोगराई इडा पिडा घेऊन जा वो मारबत’ची विनवणी करीत चिनी वस्तूंवर बहिष्काराचा संदेश मारबतीच्या माध्यमातून बडग्याने दिला.परतवाडा शहरातील विनकर समाजाच्यावतीने दरवर्षी मारबत काढण्यात येते, ही परंपरा आता युवकांनी पुढे चालविण्यासाठी पुढाकार घेतला, उत्तर साखरे व गुलाबराव शहाडे यांच्या नेतृत्वात ललित शहाडे, प्रितेश राजनबंधू, पंकज साखरे, कमलेश साखरे, वीरेंद्र विकास साखरे, गजानन शहारे, शुभम जांभूर्णेे, संदीप, करण आदी युवकांचा त्यामध्ये समावेश आहे. जुळ्या शहरात पालिका प्रशासन कितीही दावा करीत असले तरी ठिकठिकाणी कचºयाचे ढिग, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर चिखल आणि त्यातून होणारा आरोग्यावर परिणाम कायमचा आहे.प्लेगचा आजार आल्यापासून देशात मारबत काढण्याची प्रथा असली तरी जुळ्या शहरासाठी स्वच्छता मोहीम एक शाप ठरली आहे.दोन ठिकाणांवरून मारबतपरतवाडा-अचलपूर शहरात पूर्वीपासून मारबत काढली जात होती. अचलपूरची प्रथा आता थांबली. परतवाडा शहरातील भयानक चौक आणि पेन्शनपुरा भागातून मारबत काढण्यात येते. सकाळी ६ वाजता प्रत्येक घरातून सुपडे वाजवित इडा पिडा नेण्याची विनवनी करीत मारबत काढल्या गेली. शहराच्या प्रमुख सर्वच मार्गावरून निघालेली मारबत सपन प्रकल्पावर विसर्जित करण्यात आली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.चिनी वस्तू आणि डीजेवर धूममंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या मारबतीने विदेशी चिनी वस्तूच्या बहिष्काराचा बडगाला ठेवला होता, तर मारबतमध्ये सामील झालेली तरूणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आली.गेल्या ८० वर्षांपासून आम्ही वडिलोपार्जित मारबत काढण्याची प्रथा जोपसीत आहे. आता हे नेतृत्व युवकांनी स्विकारले आहे.- उत्तम साखरेमारबत आयोजक, परतवाडा.
‘इडा पिडा घेऊन जा गे मारबत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:14 PM
मागील ८० वर्षांपासून शहरात सुरू असलेली मारबत प्रथेची परंपरा मंगळवारी युवकांनी हाती घेत दोन ठिकाणावरून मारबत निघाली.
ठळक मुद्देपरंपरा : यंदा ‘मेड इन चायना’वर बंदीचा संदेश