शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड ठरले आदर्श गाव

By admin | Published: August 30, 2015 12:12 AM

ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजारग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या अशा गावांचा शासनाने पुरस्काराने सन्मान करावा. यामुळे हा आदर्श एक लोकचळवळ घेऊन लोकशाही मजबूत करणारे एक पाऊल ठरेल.शासनातर्फे विविध योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावाचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्यात आदर्श गाव, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्ती पुरस्कार यासारख्या अनके पुरस्कार आहेत. योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येतो. गावातील मतभेद विसरून जातीपातीचा विचार न करता संपूर्ण गाव एकमताने ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून देतात, असे गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव ठरतात. अशा गावांमध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेला व विकासाच्या कामाला परिपूर्ण न्याय दिला जातो. असेच एक गाव चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड हे आहे. या गावाची लोकसंख्या १०५० इतकी असून त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच इतर समाजाचे नागरिक राहतात. सर्वांचा व्यवसाय हा शेती तसेच मजुरी आहे. मागील निवडणुकीत या गावात सर्व ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले होते व या निवडणुकीत देखील सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहे व सरपंचदेखील मुस्लिम समाजाच्या नागरिकाला सर्व सदस्यांनी एकमताने केले आहे.तालुक्यातील हे गाव धुरविरहीत चुलीचे पहले गाव ठरले आहे. या गावात वृक्षारोपण, स्वच्छालय, पथदिवे, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव यासारख्या अनेक योजनांमध्ये अग्रेसर ठरलेले आहेत.पूर्वी आपल्या देशात नगर राज्य होते. या नगर राज्यामध्ये नगरातील सर्व नागरिक मिळून आपला प्रमुख निवडत होते व सर्व संमतीने नगराचा विकास व नगराच्या समस्या सोडविल्या जात होत्या. खऱ्या अर्थाने त्याकाळी लोकशाहीच नांदत होती. पण आता लोकशाहीच्या निवडणुकीमुळे गावात राजकारण शिरून गावातील वातावरण गढूळ होऊन जातीपातीच्या राजकारणामुळे गावांची विभागणी झाली आहे. पण सद्यस्थितीत लोकशाही मजबूत करण्यासाठी जे गाव एकत्र येऊून सर्व सदस्यांसह सरपंचसुद्धा अविरोध निवडून देतात, अशा गावांचा शासनाने पुरस्कार करावा तरच खऱ्या अर्थाने ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे आदर्श गाव निर्माण होईल.