मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव (रेल्वे) : वडिलांचा अपघातात मृत्यू, आईचे आजारपण, शेतात कष्ट करून शिक्षण; मात्र रूक्षतेतही हिरवळ फुलविली विवेकानंदांच्या थेट मनाला भिडणाऱ्या विचारांनी. बालपणीच मनात रुजलेले विचार प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा सुरू असलेला प्रवास अनेकांना चकीत करणारा ठरत आहे़युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे थोर संत व नेते स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी रोजी जयंती़ आजच्या भौतिक साधनांच्या काळात प्रत्येक युवकाला मोबाइलचे वेड लागले आह़े व्हॉट्स अॅप, फेसबूक, यू ट्यूबच्या चक्रव्यूूहात हा युवक अडकला असून, वाचनसंस्कृतीच कालबाह्य होत आहे, तेथे स्वामी विवेकानंद यांचे विचार घराघरांत पोहोचतील कसे? अशा स्थितीतून आर्थिक परिस्थती जेमतेम असतानाही दत्तापूर येथील विशाल कैलास मोकाशे याची धडपड सुरू आहे़ व्याख्यानांतून तो स्वामी विवेकानंदांचे विचार समुदायापुढे मांडतो आणि या विचारांनी त्यांनाही झपाटून टाकतो. तथापि, या युवकाला त्यासाठी प्रचंड संघर्षातून वाटचाल करावी लागली आहे.विशालच्या वडिलांचा अपघातात गतवर्षी मृत्यू झाला, तर आईच्या वार्धक्यामुळे शेतात काम करून तो एम़ए़ मराठी विषयात शिक्षण घेत आहे़ दर आठवड्याला कोणत्याही शाळेत, महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांचे विचार मांडण्याची, समजावून सांगण्याची त्याची एकच धडपड असते़बाराव्या वर्षापासून छंदरामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असलेले स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा पगडा विशाल मोकाशे याच्यावर इयत्ता सातवीपासून बसला. शालेय भाषणातून विवेकानंद यांचा विचार मांडायला सुरूवात केली धर्म, अध्यात्म, वेदान्त, योग यासोबत त्यांचे शिक्षणकार्य, १८९३ मध्ये शिकागो परिषदेमधील भाषणातील प्रत्येक मुद्दा विशाल मोकाशे हा व्याख्यानातून प्रभावीपणे मांडतो.शाळा, महाविद्यालयांत शिबिरेस्वामी विवेकानंद यांनी स्पर्श केलेल्या समाजशास्त्र, कला, साहित्य अशा अनेक विषयांत असलेली रूची, धार्मिक साहित्यातील आवड, शास्त्रीय संगीत किशोरावस्थेपासून व्यायाम, खेळ यात सहभाग, जुनाट अंधश्रद्धा त्यातील बारकावे विशाल मोकाशे आपल्या वाणीतून प्रत्येक शाळा, महाविद्यालये, विशेष शिबिरांतून विशद करीत आहे़ त्याने व्याख्यानांचा हजारांचा टप्पा गाठला आहे.
विवेकानंदांच्या विचारांसाठी ‘त्या’ची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:04 AM
वडिलांचा अपघातात मृत्यू, आईचे आजारपण, शेतात कष्ट करून शिक्षण; मात्र रूक्षतेतही हिरवळ फुलविली विवेकानंदांच्या थेट मनाला भिडणाऱ्या विचारांनी. बालपणीच मनात रुजलेले विचार प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा सुरू असलेला प्रवास अनेकांना चकीत करणारा ठरत आहे़
ठळक मुद्देस्वामी विवेकानंद जयंती : एक हजारांवर व्याख्यान, घराघरांत विचाराचा प्रसार