सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील भांबोरा गावात मारुती मंदिरालगतच्या ३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात हनुमान तसेच राम, लक्ष्मण, सीता एकत्र असलेली प्राचीन मूर्ती आढळून आल्या. ही घटना शनिवारी दुपारी उघड झाली. या मूर्तीच्या दर्शनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. तेथे नागरिकांनी सामूहिक भजन व कीर्तनही केल्याची चर्चा तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली.तालुक्यातील एक हजार लोकवस्तीच्या भांबोरा या गावात प्राचीन काळापासून मारुतीचे मंदिर आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ३०० वर्षे जुने वडाचे महाकाय वृक्ष होते. ते वाळल्याने महिनाभरापासून मुळासकट हे महाकाय वृक्ष निखंदून काढण्याचे काम सुरू असताना, झाडाच्या बुंध्यात दोन मूर्ती आढळल्या.महाकाय वृक्षात मूर्ती असेल याची कल्पनाही नागरिकांनी केली नव्हती. त्या मूर्ती प्राचीन घडवणीच्या आहेत. दोन्ही मूर्ती हनुमान व राम, लक्ष्मण व सीताच्या होत्या. झाडाच्या मुळाशी मूर्ती सापडल्याची वार्ता गावात पसरताच मूर्तीचे विधिवत पूजन करीत त्या लगतच्या हनुमान मंदिरात नेल्या व शेंदूर फासून स्थानापन्न केल्या.नागरिकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा सामूहिक वर्गणी करून गावात सामूहिक भोजनदान दिले. गावातील महिलांनी कीर्तन केले.दरम्यान, झाडात मूर्ती सापडल्याची चर्चा तालुक्यात होती. धार्मिक भावनांशी हा विषय जुळलेला असल्याने तो कर्णोपकर्णी तीव्रतेने पसरत आहे.गावात नव्याने मंदिर बांधण्यासाठी जुने महाकाय वडाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते या झाडाच्या मुळाशी दोन प्राचीन मूर्ती दिसल्या. त्यामुळे एकच गर्दी झाली. नागरिकांची मोठ्या प्रमाणात यावेळी श्रद्धा दिसून आली.- भालचंद्र पोल्हाड,पोलीस पाटील, भांबोरा
जुन्या वडाच्या बुंध्यात मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:01 PM
तालुक्यातील भांबोरा गावात मारुती मंदिरालगतच्या ३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात हनुमान तसेच राम, लक्ष्मण, सीता एकत्र असलेली प्राचीन मूर्ती आढळून आल्या. ही घटना शनिवारी दुपारी उघड झाली. या मूर्तीच्या दर्शनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. तेथे नागरिकांनी सामूहिक भजन व कीर्तनही केल्याची चर्चा तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली.
ठळक मुद्दे३०० वर्षांपूर्वीचे झाड : राम, लक्ष्मण, सीता, मारुतीच्या प्राचीन मूर्ती