नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका अशा इमर्जन्सी वाहनांना तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, म्हणून रस्ता मोकळा करून देणे आवश्यक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ अंतर्गत इमर्जन्सी वाहनांचा रस्ता अडविल्यास वाहन चालकाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. गत काही दिवसांत जिल्ह्यात असा एकही प्रकार घडला नाही. गर्दीच्या रस्त्यावरून जात असताना रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्याची विशेष खबरदारी घेण्यात येते. रस्ता न मिळाल्यास आवश्यक त्या ठिकाणी पोहोचण्यास इमर्जन्सी वाहनांना विलंब होऊ शकतो.
परिणामी, समस्या अधिक गंभीर बनू शकते. अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांना रस्ता देणे आवश्यक आहे. कोणी रस्ता मोकळा करून देण्यास विलंब करीत असेल किंवा रस्ता अडवत असेल, तर दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे..
'लोकमत'ने काय पाहिले?परतवाडा मार्गावर वलगाव ते बायपास मोठा अडथळाइर्विनमध्ये जिल्ह्यांतील रुग्णांवर उपचार करण्यात येतात. विविध तालुक्यातून रुग्णवाहिका रात्रंदिवस धावतात. मात्र परतवाडा-अमरावती मार्गावर चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, धारणी, चिखलदरा व मध्य प्रदेशातील रुग्णवाहिका धावतात. अशात दर्यापूर फाटा ते अमरावती बायपासपर्यंत सर्वाधिक वेळ लागतो. वलगाव बसस्थानक येथे ऑटोंचा, खासगी वाहनांचा धुडगूस व चार-पाच तालुक्यांसाठी मुख्य रस्ता असल्याने बायपासपर्यंत अनेक अडथळे पार करीत रुग्णवाहिका धावत असल्याचे चित्र नेहमीचे आहे
कठोरा नाका पंचवटी राजकमल राजापेठ गर्दीजिल्ह्याबाहेरून विविध ठिकाणांवरून येणाऱ्या रुग्णवाहिकांना अमरावती शहरात प्रवेश करताच कठोरा नाका शेगाव नाका पंचवटीपर्यंत प्रचंड वाहतुकीचा सामना उड्डाणपुलापर्यंत करावा लागतो.
दंडात्मक कारवाई नाहीअलीकडे इमर्जन्सी वाहनांचा रस्ता अडविला, अशी घटना घडलेली नाही. किंबहुना, तसा प्रकार नसल्याने दंडात्मक कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. परंतु परतवाडाशहरातील अति वस्ती असलेल्या सदर बाजार परिसरात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाला प्रचंड त्रासातून मार्ग काढावा लागला होता.
मुजोर दुचाकी व ऑटोचालकांचे सायरनकडे दुर्लक्षगर्दीच्या ठिकाणाहून रुग्णवाहिका जात असताना सुज्ञ नागरिक पटापट बाजूला होऊन रुग्णवाहिकेला जागा देतात. परंतु, काही नागरिक व वाहनचालक सायरन वाजत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा तर चक्क रुग्णवाहिका आली की काही नागरिक स्वतःहून लोकांना बाजूला करत असल्याची प्रतिक्रिया रुग्णवाहिका चालकाने व्यक्त केली. यातून ठिकठिकाणी दादागिरी व धावतानाच मध्ये प्रवासी बघून थांबणे आणि मुख्य रस्त्यावरच ऑटो यू टन वळविणे हे बऱ्याचदा अपघाताला आमंत्रण देणारे करत असल्याचे चित्र आहे.