लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार बोंडे यांनी हास्यास्पद आरोप केले आहेत. शासन भाजपचे आहे. माझी कुठलीही चौकशी करा. माझे बँक अकाऊंट तपासा. मी दोषी आढळले तर राजकारण सोडेन; पण आमदार अनिल बोंडे ज्यांची पाठराखण करतात ते पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, स्वत: अनिल बोंडे हे कुठे दोषी आढळले तर काय, असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.या मुद्यावर त्यांनी गुरुवारी दुपारी फेसबुक लाईव्हदेखील केले. त्या म्हणाल्या, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने अत्यंत उद्धट आहेत. भ्रष्टाचारी आहेत. यापूर्वी ते कोणकोणत्या पदावर होते व त्यांना त्या पदावरून का काढण्यात आले, याची चौकशी केल्यास सत्य उघडकीस येईल.आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारच. आम्ही गेलो नाही, खोपड्यातील नागरिकांवर अन्याय झाल्याने आमच्याकडे ते आलेत. लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. जीव गेला तरी बेहत्तर, परंतु आम्ही सत्यासाठी लढणार, असा वज्रनिर्धार आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.खोपडा गावांत सर्वांना प्लॉट वाटप व्हावे, उर्वरित नागरिकांनाही प्लॉट मिळावे, हे सारे न्यायतत्वाने व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, लहाने व एसडीओ कडू हे अधिकारी प्लॉट वाटपासाठी खोपडा गावात गेलेच नाही. त्यांनी मोर्शी येथे बसून वाटप केले. त्याठिकाणी ले-आउट टाकलेले नाही. हा तर नागरिकांवर अन्याय आहे.रिद्धपूर आराखडा का रेंगाळला?मोझरी विकास आराखड्याच्या धर्तीवर महानुभावपंथांची काशी म्हणून प्रख्यात श्रीक्षेत्र रिद्धपूरचा विकास आराखडा तयार झाला. मोझरी आराखड्यात ज्याप्रमाणे वरखेडचा विकास केला, तसाच मातृतीर्थ म्हणून काटसूरचा समावेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे गोविंदप्रभूंचे जन्मस्थान आहे, हा प्रयत्न कोणी खोडून काढला, याबाबत आ. बोंडे यांना विचारा. रिद्धपूरसोबत काटसूरचाही विकास व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, या गोष्टी का रेंगाळल्या, असा सवाल ठाकूर यांनी केला.
‘दोषी आढळले तर राजकारण सोडेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:14 AM
आमदार बोंडे यांनी हास्यास्पद आरोप केले आहेत. शासन भाजपचे आहे. माझी कुठलीही चौकशी करा. माझे बँक अकाऊंट तपासा. मी दोषी आढळले तर राजकारण सोडेन; पण आमदार अनिल बोंडे ज्यांची पाठराखण करतात ते पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, स्वत: अनिल बोंडे हे कुठे दोषी आढळले तर काय, .....
ठळक मुद्देयशोमतींचे फेसबुक लाईव्ह : बोंडे दोषी आढळले तर काय?