शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

हेल्मेट सक्ती मोडल्यास समुपदेशनाचा बडगा!

By admin | Published: January 17, 2016 12:09 AM

हेल्मेटसक्तीचे आदेश डावलून नियम भंग करणाऱ्याला यापुढे कमीत कमी दोन तास समुपदेशन सत्राला उपस्थित राहावे लागणार आहे.

कोण वापरतं हेल्मेट? : शासन निर्णय कागदावरच, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईप्रदीप भाकरे अमरावतीहेल्मेटसक्तीचे आदेश डावलून नियम भंग करणाऱ्याला यापुढे कमीत कमी दोन तास समुपदेशन सत्राला उपस्थित राहावे लागणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमिवर गृह विभागाने हेल्मेट व अन्य नियमांची उजळणी करणारा शासन आदेश पारित केला आहे. मात्र हेल्मेट वापरतं कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तींसाठी राज्यभर लागू असतील, असे या आदेशात नमूद असले तरी शहर आयुक्तालय किंवा जिल्ह्यात कुठेही या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासन निर्देशाला प्रशासनच कशा ‘वाकुल्या’ दाखवते हे या नव्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. १७ डिसेंबर २०१५ परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक नागपूर येथे पार पडली. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याबाबत शासन निर्णयही प्रसुत करण्यात आला. यात विविध ६ नियमभंग केल्यास ३ महिने वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश यात आहेत. वाहन चालविणाऱ्या किंवा मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटबाबतच्या नियमांचा भंग केल्यास सदर नियमांतर्गत तडजोड शुल्क वसूल करण्यापूर्वी सदर नियमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी २ तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागेल. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमिवर निघालेल्या या आदेशाच्या अंमलबजावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. मद्यपींची खैर नाही; भोगावा लागणार कारावासदारू पिवून किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे या गुन्ह्यासाठी पोलीस विभाग वाहन परवाना निलंबित करण्याव्यतिरिक्त खटला दाखल करु शकतात. तसेच मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ नुसार न्यायालयाकडे अगदी पहिल्या गुन्ह्यासाठी आरोपीच्या कैदेची मागणी करावी, अशा स्पष्ट सूचना शासनादेशातून पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. या नियमभंगावर होईल कारवाईविहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणेलाल सिग्नल ओलांडून जाणे.मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे.मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे.दारू पिवून/अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे.वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे हा नियमभंग केल्यास किमान तीन महिने परवाना निलंबित करण्याचे ‘पॉवर’ पोलिसांना आहेत.-तर तीन महिने वाहनपरवाना निलंबितमोटारवाहन अधिनियम, १९८८ कलम १९, ९ केंद्रीय वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार ६ गुन्ह्याकरिता वाहन चालकांचा परवाना किमान तीन महिने निलंबित करण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने दिल्या आहेत. तथापी झंझट नको म्हणून वाहतूक विभाग त्याकडे फारसा लक्ष देत नाही.अंमलबजावणी करणारेही हेल्मेटविनाचहेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. तथापि एखादा अपवाद वगळता बहुतांश वाहतूक पोलीस हेल्मेटविनाच वावरताच तत्कालीन पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी किमान पोलीस आयुक्तालय कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले होते. मात्र त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न!