अमरावती:
पदवीधर निवडणुकीत 47101 हा विजयाचा जादुई आकडा आहे. यापासून महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे 2224 मतांनी दूर आहे. सद्यस्थितीत बाद फेरी सुरू असून वीस उमेदवार यांची मते मोजणी झालेली आहेत. अद्याप तीन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंती क्रमाची मते मोजणी बाकी आहेत.
गुरुवारी रात्री अवैध मतांच्या फेरमोजणीची मागणी भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी केली होती. यामध्ये 348 मते वैध ठरली. या फेरमोजणीमुळे बाद फेरीला दोन तासांचा उशीर झाला. बाद फेरीतही विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास मतांची आघाडी असलेले अंतिम दोन उमेदवारांपैकी सर्वाधिक असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे सध्या 44877 व भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना 42117 मते मिळाली आहे. अद्याप बाद फेरीत वंचित अनिल अमलकर यांच्या 4181 मतांपैकी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू झालेली आहे.