शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

तू जर शरीरसुख देत नसेल तर एखादी तरुणी आणून दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:10 AM

अमरावती : नोकरीचे आमिष दाखवून एका प्रकल्प संचालकाने एका महिलेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला ...

अमरावती : नोकरीचे आमिष दाखवून एका प्रकल्प संचालकाने एका महिलेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तू जर शरीर सुख देत नसेल तर एखादी तरुणी आणून दे, असे आरोपीने महिलेस म्हटल्याची धक्कादायक घटना पंचवटी चौकातील लवाद न्यायालयात घडली असून, एका महिलेने शनिवारी गाडगे नगर पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी लवाद न्यायालयाचा प्रकल्प संचालक सिद्धार्थ विश्वनाथ रामटेके (३८ रा. पंचशील चौक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. महिलेने आरोप केला आहे की, आरोपीने जॉब उपलब्ध असल्याचे सांगून जनसंपर्क अधिकारी पदावर काम करण्यासाठी आदेशपत्र दिले नाही. विना आदेशाने ती हजर झाली असता, त्याने पोलीस चरित्र प्रमाणपत्राची मागणी केली; परंतु महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल असल्यामुळे ते प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असे महिलेने म्हटले. त्यावेळी आरोपीने हात पकडून कक्षात नेले आणि आरोपीने शरीर सुखाची मागणी केली. असे तक्रारीत नमूद आहे. या जॉबसाठी तिला मासिक १५ हजार मिळणार होते. आरोपीविरुद्ध कलम ३५४, ५०६ नुसार गुन्हा नोंदविला.