अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच जिल्हा परिषदेतील वाढती गर्दी रोखण्यासाठी आता कामानिमित्त सीईओंसह खातेप्रमुखांना भेटायचे असेल तर अगोदर कोरोना चाचणीचा रिपोर्ट दाखवा. तो निगेटिव्ह असल्याशिवाय भेटता येणार आहे. यासंदर्भात २९ एप्रिल रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश जारी केला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून अंमलबजावणी केली जात आहे. अशातच मिनीमंत्रालयातील वाढती गर्दी रोखण्यासाठी अभ्यागत, नागरिकांसाठी ई-मेल अथवा व्हॉट्सॲपवर निवेदन पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य कारवाईच्या सूचनाही सीईओंनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत तातडीची बाब असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन शासनाने केले आहे. सद्यस्थितीत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बाहेरील नागरिकांना खातेप्रमुखांना भेटणे आवश्यक असल्यास नागरिकांनी रॅपिड अँटिजेन टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखविल्याशिवाय भेटता येणार नाही. याबाबत सीईओंच्या दालनासह सर्व विभागात याबाबत सूचना लावल्या आहेत.
बॉक्स
मिनीमंत्रालयात चाचणीची सोय
जिल्हा परिषदेत कामानिमित्त खातेप्रमुखांना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना भेटावयाचे असल्यास व कोरोना चाचणीचा रिपोर्ट नसल्यास अशा नागरिकांसह इतरांसाठीही मुख्यालय परिसरात कोरोना चाचणीचे सेंटर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोट
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. असे असताना जिल्हा परिषदेत वाढत असलेली गर्दी रोखण्यासाठी यापुढे अधिकाऱ्यांना भेटण्यापूर्वी कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्याशिवाय अधिकाऱ्यांना भेटता येणार नाही. विशेष चाचणीही सुविधा झेडपी प्रशासनाने मुख्यालयात सुरू केलेली आहे.
- अविश्यांत पंडा,
मुख्यकार्यकारी अधिकारी