शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

कर्जमाफीच्या चर्चेत तूर केंद्रांकडे दुर्लक्ष

By admin | Published: June 17, 2017 12:02 AM

जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

सहा दिवसांपासून केंद्र बंद : पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. १० जूनपासून जिल्ह्यातील बाराही केंद्रांवर तूर खरेदी बंद आहे. केवळ बाजार समितीमध्ये नोंद केलेली तूर खरेदी करण्यात आली. अद्याप टोकन दिलेली परंतु १८,६४५ शेतकऱ्यांच्या घरात असलेली चार लाख १६ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. सलग सहाव्या दिवशीही खरेदी केंद्र बंदच असल्याने मुदतवाढ केव्हा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली. या मुदतीत प्रथम बाजार समितीतील उघड्यावरील तूर खरेदी करण्याची अट घातली. त्यामुळे खरेदी यंत्रणा असलेल्या डीएमओव्दारा ही तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तुरीची मोजणी संपली. मात्र, टोकन दिलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली नाही.सध्या मृगाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व कामांची लगबग वाढली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करावी, की तूर मोजणीसाठी केंद्रावर जावे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर व धारणी केंद्रावर टीन शेडची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. शासनाने केंद्राला त्वरीत मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांकडील नोंद झालेल्या तुरीची खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.तालुकानिहाय बाकी असलेली तूर खरेदी सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जीला २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजारला १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वेला १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूरला २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगावला ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणीला ८४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शीला १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वरला १,७९२ शेतकऱ्यांची ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ टोकन दिलेल्या तुरीची खरेदी व मोजणी बाकी आहे.सर्वच केंद्रांवर ३१ मेपर्यंत नोंद झालेली व टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात आली आहे. अद्याप मुदतवाढीचा आदेश नाही. पावसाळ्यामुळे टप्प्याटप्प्यात तुरीची खरेदी होण्याची शक्यता आहे.- गौतम वालदेजिल्हा उपनिबंधक