शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

सिपना वन्यजीव क्षेत्रात अवैध ‘ब्लास्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 10:57 PM

सिपना वन्यजीवांतर्गत सेमाडोह वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग करण्यात आले.

ठळक मुद्देविहीर बांधकामासाठी स्फोट : सेमाडोह वनकर्मचाºयांचे छुपे समर्थन ?

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सिपना वन्यजीवांतर्गत सेमाडोह वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग करण्यात आले. या स्फोटांचा मोठा आवाज परिसरात अनेक लोकानी ऐकला. अनेक अफवा देखील पसरल्यात. मात्र, दुसरीकडे असे काहीच झाले नसल्याचा दावा वनअधिकाºयांनी केला आहे.अमरावती-बुºहाणपूर राज्य महामार्गावरील हरिसाल ते सेमाडोह या भागातील व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी परतवाडा मार्गावर व्याघ्र प्रकल्पाचा नाका आहे. या नाक्यावर रात्री आठपासून दर दोन तासांच्या अंतराने वाहतूक सोडली जाते. वन्यजीवांच्या मुक्त संचारात बाधा येऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.गुरूवारी रात्री ८.३० वाजता सेमाडोह नाक्यावर वाहने उभी होती. रात्री दहा वाजता वाहने सोडली जातील, असे सांगण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास मोठा आवाज झाला. कुठेतरी बाँब फुटल्याचा तर्क यावेळी नाक्यावरील लोकांनी लावला. तर दुसरीकडे नाक्यावर अलेल्या वनकर्मचाºयांनी याप्रकाराची सत्यता उघड केली. जवळच शासकीय योजनेंतर्गत शेतात विहिरीचे बांधकाम सुरू असून तेथे ‘ब्लास्टिंग’ सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेच्यावेळी सदर प्रतिनिधी स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. यावरून वन्यजीव क्षेत्रात अवैध ब्लास्टिंग होत असल्याची बाब स्पष्ट झाली.सेमाडोहला पुनर्वसनाची प्रतीक्षामेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह हे गाव पुनर्वसनासाठी प्रतीक्षारत आहे. काही वर्षांपूर्वी प्रतिकुटुंब १० लाख रूपये देण्याचे ठरले होते. मात्र, पुनर्वसनाला उशिर झाल्याने गावकºयांनी रक्कम वाढविण्याची मागणी केल्याने पुन्हा गावाचे पुनर्वसन रखडले आहे.पहिलीच घटनासदर प्रतिनिधी ‘त्या’ विहीरीच्या कामाजवळ पोहोचल्यावर सिपना नदीच्या पुलाला लागूनच एक जेसीबी खोदकाम करून थांबला होता. वाहनाच्या लाईटमुळे ‘ब्लास्टिंग’ करणाºयांनी जंगलात पळ काढला. अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पात ही घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. वनकर्मचाºयांना विचारपूस केली असता भैसदेही मध्यप्रदेशातील कंत्राटदार जेसीबीद्वारे विहिरीचे बांधकाम व खोदकाम करीत असल्याचे कळले.आश्रय कुणाचा?व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आगपेटीसह इतर ज्वलनशिल पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असताना मध्यरात्री गोळा-बारूदचा वापर सर्रास सुरू आहे. मात्र, तेथील वनकर्मचारी याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करताना दिसून आले. या अतीगंभीर प्रकाराला वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाचा आश्रय असल्याशिवाय हा प्रकार शक्य नाही, असे बोलले जात आहे.

ब्लास्टिंगची कोणतीही घटना घडलेली नाही. गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. चौकशी केल्यानंतर ती माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. ब्लास्टिंगबाबत सर्व अफवा आहेत.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा