पहिल्या कारवाईत अवैध देशी दारू विक्रेत्यांवर करण्यात आली. ही कारवाई चांदूरबाजार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिरूळ पूर्णा येथे करण्यात आली. याठिकाणी २० हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या. या. १५ हजार ३६० रुपयांची देशी दारू ज्यात १८० एम.एल.च्या१९२ बाॅटलचा समावेश आहे. ४ हजार ८१० रुपये रोख आहे. याप्रकरणी अनिल जैस्वाल, (४६,रा. हिरूळपूर्णा) याला अटक करण्यात आली. सदर आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल, पुढील कारवाईसाठी चांदूर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
पथकाने दुसरी कारवाई अवैध वाळू तस्करी करणाऱ्यावर केली. ही कारवाई तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत, पूर्णा नगर बस स्टॅण्डवर करण्यात आली. या. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंदाजे ५ लाख रुपयांचा एक ट्रॅक्टर, ५ हजार रुपयांची एक ब्रास वाळू व १० हजारांचा एक मोबाईलचा या. समावेश आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सचिन बोडखे,वय २० या. पूर्णा नगर व ट्रॅक्टर मालक दानिश सौदागर रा. पूर्णानगर यांना अटक करण्यात आली.या दोघांनाही मुद्देमालासह पुढील कारवाई साठी,आसेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या दोन्ही कारवाया गुन्हे शाखेचे स. पो. नि. गोपाल उपाध्ये, ना.पो.का.प्रमोद खर्चे, सय्यद अजमत, पो.का.अमोल केंद्रे, प्रवीण अंबाडकर, चालक रवींद्र मानकर यांनी केल्या.