शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

अवैध सावकारी, साईनगरातील गुरुजीच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहायक निबंधकांकडील तक्रार 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 29, 2023 7:30 PM

अवैध सावकारीच्या संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली.

अमरावती: अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने येथील साईनगर परिसरातील मोहननगर येथे राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी येथील पथकाने बुधवारी धाड टाकली. यामध्ये अवैध सावकारीच्या संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. सदर व्यक्ती अंजनगाव सुर्जी येथील प्रागतिक विद्यालयात माध्यमिक शिक्षक असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र भीमराव भागवत (रा. मोहननगर, साई मंदिराजवळ) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी संदर्भातील तक्रार अचलपूर एआर कार्यालयास प्राप्त झाली. यामध्ये तक्रारकर्ता हे अचलपूर तालुक्यातील रहिवासी आहे. मात्र, भागवत हे अमरावतीला राहत असल्याने तक्रार अमरावती सहायक निबंधकांकडे पाठविण्यात आली. यामध्ये चौकशीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदीनूसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी एक पथक गठित गेले व या पथकाने नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील भागवत यांच्या घरी धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये खरेदी खत, इसार पावती, कोरे धनादेश, व्याजाच्या कच्च्या नोंदी असलेल्या डायरी जप्त करण्यात आल्याचे डीडीआर कार्यालयाचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले. ही कारवाई पथकप्रमुख व नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे, सहायक कर्मचारी अविनाश महल्ले, नीलेश सपकाळ, चेतना कुचे यांनी केली.

अचलपूर एआर करणार कागदपत्रांची पडताळणीअचलपूर कार्यालयात तक्रार झालेली असल्याने जप्तीमधील सीलबंद कागदपत्रे हे अचलपूर एआर परेश गुल्हाने यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यांच्याद्वारा या कागदपत्रांची पडताळणी व शहानिशा करण्यात येईल. यामध्ये अवैध सावकारी सिद्ध झाल्यास कारवाई होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणीदेखील अचलपूर येथे होणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Amravatiअमरावती