शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

बारूदच्या कांड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक!

By प्रदीप भाकरे | Published: March 22, 2024 1:55 PM

स्फोटक परवान्याचे उल्लंघन : तिघांविरूध्द गुन्हा, २६५ स्फोटक कांडया, डिटोनेटर्स केबल जप्त.

प्रदीप भाकरे, अमरावती: बारूदच्या स्फोटक कांड्या व डिटोनेटिंग केबलची कार व दुचाकीच्या माध्यमातून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असतांना २१ मार्च रोजी रात्री कु-हा ते तिवसा कौंडण्यपूर वाय पॉईंटजवळ ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून स्फोटक कांड्या, डिटोनेटिंग केबल, कार व दुचाकी जप्त करण्यात आल्या.

कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतून स्फोटकांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्याआधारे कार व दुचाकीस्वार अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी गजानन मारोतराव डंबारे (४४, रा. आमला, ता. चांदुर रेल्वे) हा त्याच्या कारमध्ये १४६ स्फोटक कांडया व ९९ नग डिटोनेटिंग केबलसह मिळून आला. तसेच त्याच्यासोबतच्या शुभम श्रीकृष्ण सुलताने (२२) व अविनाश राजेंद्र सुलताने (३०, दोन्ही रा. गोठा, ता. तिवसा) हे त्यांच्या दुचाकीवर ११९ नग स्फोटक कांडया व ८० नग डिटोनेटिग केबलसह आढळून आले. त्या एकुण २६५ नग कांड्या, १७९ डिटोनेटिंग केबल, एमएच ४६ एक्स ४६७८ ही ३.५० लाख रुपये किमतीची कार व एक दुचाकी असा एकुण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ना परवाना ना कागदपत्रे

अटक तीनही आरोपी हे ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारी स्फोटके खाजगी वाहनामध्ये बाळगून वाहतूक करतांना आढळून आले. त्यांच्याकडे स्फोटकांबाबतची कागदपत्रे तथा शॉर्ट फायररचा परवाना नव्हता. तो सोबत न बाळगता आरोपी परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना न करता हाताळतांना आढळल्याने त्यांच्याविरूध्द कुऱ्हा पोलिसांत भारतीय स्फोटक अधिनियम १८८४ चे कलम ९ ब, १२ व भादंविच्या कलम २८६, ३३६, १८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.ग्रामीण भागात धडक मोहिम

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांतर्फे अवैध व्यवसायिक, अवैध शस्त्र व स्फोटके बाळगणारे, गुंड प्रवृत्तीचे इसमांवर कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सागर हटवार व मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधान यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी