अमरावती : निलगिरी तसेच सह्याद्रीच्या पर्वतामधील घनदाट अरण्यात भ्रमंती करणारे निलगिरी टॅ्रकर्सचे बावीस सदस्य ११ जानेवारी रोजी अंबानगरीत दाखल झाले आहेत. या चमूचा बुधवार पासून सलग तीन दिवसमेळघाटात भ्रमंती करणार आहेत. या चमूत २० ते ६८ वयोगटातील महिला व पुरूषाचा समावेश आहे. मेळघाट भ्रमंती दरम्यान अरूण मोंढे यांच्या सहकार्यातून व एकलव्य विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृ तीचा अभ्यास ही चमू करणार आहे. या चमूमध्ये अमरावती येथील प्रफुल्ल देशमुख, संजय इंगोले, बाबासाहेब देशमुख, निरज राजूरकर, बेंगलोर येथील एस रमेश, के. श्रीकांत, गुरूप्रसाद, हरीकृष्णा, एल शकुंतला, मुंबईच्या विद्या मांजरेकर, वर्षा भोयनार, श्यामला चंद्रा, माणिक माने, रत्नागिरीचे वल्लभ वडजू, प्रसन्न महाडिक, आंध्रप्रदेश मधील के. लक्ष्मी, के. श्याम सुंदर, आदीचा समावेश आहे. प्रारंभी केवळ आवड म्हणून काही हौशी मंडळींनी ट्रेकिंगला सुरुवात केली. निलगिरीमध्ये या चमूतील तसेच सदस्यांची ओळख झाली. काही सदस्यांनी सर्व चमुला एकत्र करण्यासाठी सह्याद्रीची भ्रंमती ठेवण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर आता ही चमू मेळघाट भ्रमंती करीता शहरात दाखल झाल्याचे विहिपचे शहराध्यक्ष अरूण मोंढे यांनी सांगितले.
मेळघाटात निलगिरी ट्रॅकर्सची भ्रमंती
By admin | Published: January 19, 2017 12:11 AM