लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता. तसे निवेदन त्यांनी गुरुवारी पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. वृत्त लिहिस्तोवर शहरातील अनेक व्यापारी पोलिस ठाण्यात बसलेले होते.मंगळवारी परतवाडा शहरातील पेन्शनपुरा भागात सल्लू ऊर्फ सलमानची धारदार शस्त्राने दीपक ऊर्फ झाशी कुंबलेले याने त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली होती त्यानंतर बुधवारी दुपारी १० वाजता ५० ते ६० च्या जमावाने येथील काही दुकानांवर दगडफेक करून चाकूने व्यापाऱ्यांना गंभीर जखमी केले. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. शहरातील मुख्य मार्गावरील स्नेहा बुक डेपोनजीक ठिय्या आंदोलन केले होते. हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन केली. हल्लेखोरांचा शोध आहे. संबंधित हत्या प्रकरणात व्यापाऱ्यांचा कुठलाच संबंध नसताना विशिष्ट समाजाच्या जमावाने तेथे दगडफेक केल्याने जुळ्या शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. उजिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: जनता दरबाराच्या निमित्ताने शहरात उपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक वेळी ते घटनेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. बुधवारी दिवसभर ठिय्या आंदोलनानंतर व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांनी सायंकाळी पुन्हा पोलिस ठाण्यात धाव घेतली.गुरुवारचा आठवडी बाजार दहशतीखालीदोन दिवस बाजारपेठ बंद असताना गुरुवारीसुद्धा परिस्थिती पूर्णत: निवळली नसल्याने नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता. सर्व प्रतिष्ठाने उघडी असताना खरेदीसाठी नागरिक फिरकलेच नाहीत.तीन टीम गठितबुधवारी शहरात दहशत पसरविणाºया हल्लेखोरांचा शोध प्रतिष्ठानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी घेतला. त्यातून अनेकांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे तीन पथक गठीत केले आहत बुधवारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व चाकू हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर शहरातून पसार झाल्याची माहिती आहे पोलिसांनी गुरुवारी रात्रीसुद्धा त्यांची झडती घेतली. मात्र, हल्लेखोर दिसले नाही. फिर्यादी लखन श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६० ते ७० आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.गुरुवारी व्यापाऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले. त्यांच्यासोबत चर्चा केली. आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यादृष्टीने व्यापारी व नागरिकांना सहकार्याचे आव्हान केले आहे.- प्रवीण पोटे,पालकमंत्री अमरावती
आरोपींना तत्काळ अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:04 AM
स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : काहींना ताब्यात घेतल्याने बंद मागे