पत्रपरिषद : प्रवीण पोटे यांचे आदेशअमरावती : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या तुरीला हमीभाव मिळण्यासाठी खरेदी केंद्रावर स्वतंत्र केंद्र उभारावे. अधिक मनुष्यबळाचा उपयोग करून प्रत्येक दिवसाला हजार क्विंटल तूर खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रांवर तुरीचा पेरा झाला आहे. त्यामुळे सुमारे ३० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होणार आहे. ही बाब लक्षात घेता नाफेड व बाजार समितीच्या केंद्राने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तूर खरेदीसाठी स्वतंत्र खरेदी केंद्रे उभारावीत. दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी होईल या बेताने व्यवस्था करण्यात यावी. तूर डाळ भरण्यासाठी बारदान्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले.तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून व्यापारी लोक कमी दरात तूर खरेदी करून जास्त दराने तूर विकत आहे. अशामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन व्यापाऱ्यांना अधिक लाभ होत आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीचा हमीभाव मिळावा म्हणून शासनाने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना शेतमाल मोजण्यासाठी १० ते २० दिवस थांबावे लागत आहे. यासाठी खरेदी केंद्राने अधिक प्रमाणात वजन काटे उपलब्ध करावीत. खरेदी केंद्रात अडचण अथवा साधनसामग्रीची गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाला कळवावे, असेही पोटे यांनी सांगितले. यावर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेत २५० गावांची निवड केली जाणार आहे. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास ही तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रपरिषदेला आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.पाणीटंचाई निवारणार्थ खबरदारीराज्य शासनाने जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ सुमारे २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाक डून केवळ ८ कोटी ७८ लाख रूपयांची मागणी आली असल्याचे पालकमंत्री पोटे यांनी केली आहे. सध्या जिल्हाभरात कुठेही पाणीटंचाई नाही. मात्र चिखलदरा तालुक्यात काही गावांमध्ये टँकरद्वारा पाणीपुरवठा करावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेला खबरदारी बाळण्याची सुचना दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. मेळघाटात काही ठिकाणी विजेची समस्या होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकराने मध्यप्रदेशातून वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे २२० केव्ही वीज केंद्राच्या माध्यमातून विजेची समस्या बऱ्यापैकी निवळली आहे. ज्याठिकाणी पाणीपुरवठा योजनेची देयके थकीत आहेत, ती देयके भरण्यासाठी निधी नाही. यासाठी सोलरपंपच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)-हा तर बाबासाहेबांचा अपमानलोकशाहीत मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला आहे.परंतु महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप करणाऱ्यांकडून बाबासाहेबांचा अपमान केला जात आहे. मतदान यंत्रात गडबड करता आली असती तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतही 'कमळ' उगवले असते, असे ना. पोटे म्हणाले. याप्रकाराची चौकशी केल्यास ती जिल्हा परिषदेतूनच सुरू करावी लागेल, असे पालकमंत्री पोटे यांनी निक्षून सांगितले.
जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करा
By admin | Published: March 01, 2017 12:07 AM