बसपाचे शहराध्यक्ष सुदाम बोरकर यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले.
राजकीय आरक्षणाचा १० वर्षे लाभ घेऊन गलेलठ्ठ होणारे पुढारी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणाला विरोध करीत असल्याचा आरोप बसपाने केला. त्यामुळे राज्य शासनाने ३३ टक्के आरक्षणाचा जीआर रद्द करून मागासवर्गीयांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उमेश मेश्राम, प्रवीण गाङवे, किरण सहारे, जयदेव पाटील, सुरेश भगत, वसंत धंदर
आदी उपस्थित होते.
--------------------------
मारहाणप्रकरणी एसपींना निवेदन
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर येथील प्रभारी ठाणेदार, जमादार, महिला पोलिसांनी तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका पारधी समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुरूवारी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना निवेदन सादर करण्यात आले. नीतेश रवींद्र पवार (३८, रा. नांदगाव खंडेश्र्वर) यांनी एसपींकडे तक्रार दिली आहे.
-------------------