शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

तोतया प्रशासकीय निरीक्षकाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:00 AM

पोलीस सूत्रांनुसार, सुबोध दीपक खोब्रागडे (१९, रा. प्रवीणनगर, व्हीएमव्ही, अमरावती), असे अधिकाºयाचा बनाव करणाºया तोतयाचे नाव आहे. या प्रकरणात फ्रेजरपुराचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनचालकाने कॉल केला.

ठळक मुद्दे१९ वर्षीय युवकाचा प्रताप । वाहनचालकाने दिली पोलिसांना माहिती

अमरावती : देशाच्या राष्ट्रपतींकडे ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह आॅब्झर्व्हर’ असल्याची बतावणी करणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय युवकाला फ्रेजरपुरा पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास गजाआड केले. त्याची माहिती त्याच्या वाहनावर चालक असलेल्या २५ वर्षीय युवकाने पोलिसांना दिली. त्यावरून अमरावतीचाच रहिवासी असलेल्या या युवकाचे बिंग फुटले. शनिवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.पोलीस सूत्रांनुसार, सुबोध दीपक खोब्रागडे (१९, रा. प्रवीणनगर, व्हीएमव्ही, अमरावती), असे अधिकाºयाचा बनाव करणाºया तोतयाचे नाव आहे. या प्रकरणात फ्रेजरपुराचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनचालकाने कॉल केला. एक इसम आयएएस अधिकारी म्हणून मागील १० दिवसांपासून कारवर अंबर दिवा लावून शहरात फिरत आहे व जेल रोड येथील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात येणार असल्याची माहिती त्याने बालाजी लालपालवाले यांना दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस उपनिरीक्षक मंठाळे हे कर्मचाऱ्यांसह जेल रोडवरील शासकीय मुलींचे वसतिगृहात धडकले. वॉर्डनची परवानगी घेऊन त्यांनी आत पाहणी केली असता, एमएच २७ एक्स ९८९० क्रमांकाचे चारचाकी वाहन निदर्शनास आले. त्यावर अंबर दिवा लावलेला होता.पोलिसांनी चारचाकीच्या चालकाची चौकशी केली असता, त्याने सागर राजू ढोके (२५, रा. गजानन नगर, अमरावती) अशी स्वत:ची ओळख दिली आणि त्यानेच पोलिसांना कळविल्याचे सांगितले. त्याने सुबोधला बोलावून घेतले. पोलिसांना त्याने आयएएस अधिकारी असल्याचे सांगत, ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह आॅफिसर आॅफ आॅनरेबल प्रेसिडेंट आॅफ इंडिया’ अशी ओळख दिली. पोलिसांनी संशयावरून त्याच्याकडील बॅगची तपासणी केली व अंगझडती घेतली असता, त्यात राजमुद्रा अंकित बनावट शासकीय दस्तावेज आढळले. त्याच्याकडील कारसह ३ लाख १ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पीएसआय बालाजी लालपालवाले यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम १७०, १७१, ४१७, ४१९ अन्वये रात्री ११.१५ वाजता गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संतोष तोकलवाड करीत आहेत.कुणाला फसविले? आयएएस अधिकारी असल्याचे भासविणाºया सुबोधने आणखी कुणाला फसविले, ही बाब त्याला एमसीआर मिळाल्यामुळे गुलदस्त्यातच राहिली आहे.

टॅग्स :Arrestअटक