आॅनलाईन लोकमतवरूड : कृषिउद्योग प्रामाणिकपणे व संशोधक वृत्तीने केल्यास शेती नफ्यात राहते. जल, वायू व भूमीचे संगोपन नीट केल्यास शेतीचे आरोग्य चांगले राहते आणि मिश्र पिकांतून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येते, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील कराड येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शेतकरी शंकरराव खोत यांनी केले.स्थानिक बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी शंकरराव खोत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. वसुधा बोंडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, नगराध्यक्ष स्वाती आंडे, मोर्शीच्या नगराध्यक्ष शीला रोडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, बाळू मुरूमकर, अर्चना मुरूमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए.एस. खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी. देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.तीन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन आ. अनिल बोंडे यांनी केले आहे. उद्घाटनानंतर मातीपरीक्षणाचे महत्त्व, शेतीपूरक व्यवसायाची श्रीमंती, वातावरणातील बदलाचा परिणाम, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, पशुपालन व दुग्धव्यवसाय, मशरूम, लागवड आदी नफ्याच्या शेतीबाबत सुवर्ण कोकण समूहाचे सतीश परब यांनी मार्गदर्शन केले. संचालन बंटी कोहळे व आभार प्रदर्शन राजकुमार राउत यांनी केले.
जल, वायू, भूमीच्या संगोपनातून जमिनीचे आरोग्य सुधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:13 AM
कृषिउद्योग प्रामाणिकपणे व संशोधक वृत्तीने केल्यास शेती नफ्यात राहते. जल, वायू व भूमीचे संगोपन नीट केल्यास शेतीचे आरोग्य चांगले राहते आणि मिश्र पिकांतून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येते, ...
ठळक मुद्देशंकर खोत : वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी परिषदेचे थाटात उद्घाटन