शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा करा

By admin | Published: June 10, 2016 12:21 AM

कृषी विभागामार्फत विविध प्रकल्पांमध्ये व योजनांमध्ये वाटप करण्यात येणारा निविष्ठा परवाने वाटपातून देण्यात याव्यात.

वाटपावर बहिष्कार : राज्य कृषी सहायक संघटनेची मागणी अमरावती : कृषी विभागामार्फत विविध प्रकल्पांमध्ये व योजनांमध्ये वाटप करण्यात येणारा निविष्ठा परवाने वाटपातून देण्यात याव्यात. या प्रणालीमध्ये सुधारणा न झाल्यास वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेद्वारा शासनाला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या योजनांमधील लोकवाटा वसुलीचे काम कृषी सहायकांमार्फत करण्यात येते. त्यांच्याकडे आर्थिक वसुलीचे कोणतेच अधिकार नसताना व लोकवाटा वसुलीची कोणतीच शासकीय पावती लाभार्थी शेतकऱ्यांना न देता वरिष्ठ अधिकारी दबाबतंत्राचा वापर करून लोकवाटा वसूल करतात आणि कृषी सहायकांमार्फत विनापरवाना निविष्ठा वाटप करण्यात येतात, असा आरोप विनेदनात करण्यात आलेला आहे. या निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा करण्यासाठी तत्कालीन आयुक्त उमाकांत दांगट यांनी १६ सप्टेंबर २०१३ ला परिपत्रक जारी करून निविष्ठा वाटपासंदर्भात नियमावली संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी विभागाला दिली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निविष्ठा वाटपाचे काम करणे कठीण झाले. तसेच परवान्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असल्याने त्यांची जबाबदारी वाढली. परंतु या नियमाला बाजूला सारून विनापरवाना निविष्ठा वाटप करण्यात आले. मागील वर्षी परवान्यावर निविष्ठा वाटप करण्यात आले, तर लोकवाटा विनापावती जमा करण्यात आला होता. यंंदाच्या खरीप हंगामात निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा न झाल्यास वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)