अमरावती : राज्य शासनाने महिलांसाठीएसटी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी सुरू केली. शुक्रवार या महिला सन्मान योजना अंमलबजावणी पहिल्या दिवशी विभागातील ८ एसटी आगारांमधून १२ हजार ५६८ महिला प्रवाशांनी सन्मानचा पन्नास टक्के सवलतीत प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला प्रवाशांची हे चांदूर रेल्वे आगारात सर्वाधिक १ हजार ९५४ महिला प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतल्याची नोंद केली गेली आहे. पन्नास टक्के सवलतीच्या दराने मिळालेल्या तिकिटांमुळे प्रवासी महिलामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
राज्य शासनाने अर्थसंकल्पातूनच महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी आठवडा भरातच सुरू करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या साधी, मिनी, निमआराम, विनावातानुकूलित स्लिपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासात ही सवलत लागू झाली आहे.त्यामुळे महिला प्रवाशांनी एकाच दिवसात पन्नास टक्के सवलतीत १२ हजार ५६८ प्रवशांनी प्रवास केला असल्याची नोंद राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे. दररोज वेगवगळ्या ठिकाणी एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठी आहे. अशातच सरकारने आता एसटी बसेस मध्ये महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. याचा परिणाम लगेच प्रवाशी संख्येच्या आकडेवारीवरून दिसून येते. विभाग नियंत्रक कार्यालयातकडून प्राप्त माहितीनुसार महिला सन्मान योजनेत एकाच दिवसात १२ हजार ५६८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.खासगी बसेसकडून पुन्हा एसटीकडे
राज्यभरात ही सवलत लागू असल्याने अमरावती अकोला व अमरावती नागपूर या मार्गावरील प्रवासी महिलांचा ओढा एसटीकडे वाढला. आरामदायी बसेसच्या तुलनेत हा खर्च निम्म्यावर आल्याने या महिलांनी एसटीला पसंती दिली. तसेच वातानुकूलित, स्लिपर वाहनांनाही सवलत असल्याने एसटी प्रवासाकडे आपोआप हा ओढा वाढत आहेआगारनिहाय महिला प्रवाशी संख्या
अमरावती-१०२७बडनेरा-९७२परतवाडा-१७०७वरुड-१८९१चांदूर रेल्वे-१९५४दर्यापूर-१७७३मोर्शी-१७४१चांदूूर बाजार-१५०३एकूृण -१२५६८
महिला प्रवाशांना तिकिट दरात पन्नास टक्के सलवती दिली आहे.विभागात १२५६८ प्रवाशांनी प्रवास केला.यामधून ३ लाख २७ हजार ७०२ रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे.दिवसभरात एकूण सर्व मिळून ८४५७० प्रवाशांनी प्रवास केला.यासर्व मियून २९ लाख ३९ हजार २०९ रूपये प्राप्त झाले.सध्या महिला प्रवाशांचा बसेसला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
- निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक