शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

अमरावतीमध्ये ७२ हजार वाहन चालकांकडे ४.५८ कोटींचा दंड थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:15 PM

८६ टक्के दंड वसुली थकली : महिन्याकाठी वाढत चालली आहे अनपेड ई-चलानची रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण पोलिस दलातील जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते जूनदरम्यान तब्बल ९८ हजार ६८३ वाहन चालकांना ई-चलानने ५ कोटी २८ लाख ७४ हजार रुपये दंड ठोठावला. त्यातील केवळ १४ टक्के, अर्थात २६ हजार २२३ वाहन चालकांनी ७० लाख ५२ हजार ८०० रुपये दंड भरला, तर तब्बल ७२ हजार ४६० वाहनधारकांनी त्यांच्याकडे असलेला ४ कोटी ५८ लाख २१ हजार २०० रुपये दंड भरलाच नाही. ती रक्कम अनपेड राहिली. अर्थात, ती रक्कम त्या वाहन चालकांनी भरलीच नाही. दर महिन्यात, दरवर्षी त्या अनपेड चलनाच्या रकमेत कोट्यवधींची वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतुकीविषयीच्या उपाययोजना राबविण्यास मर्यादा येत आहेत.

"ग्रामीण वाहतूक शाखेने सहा महिन्यांत वाहनधारकांना ५.२८ कोटी रुपयांचा दंड ई-चलानने आकारला. पैकी ७०.५२ लाख रुपये भरले. अनपेड चलानची रक्कम ४.५८ कोटीं आहे. चलानधारकांनी थकीत दंड त्वरित भरावा."- सतीश पाटील, पीआय, जिल्हा वाहतूक शाखा

दीड वर्षात १४ कोटी रुपये थकलेग्रामीण वाहतूक शाखेने २०२३ या वर्षभरात एकूण २ लाख १२ हजार ४३८ वाहन चालकांना १०.६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यापैकी केवळ १ कोटी ७८ लाख ९१ हजार ६५० रुपये दंड वसूल केला, तर तब्बल ८.८८ कोटी रुपये दंड थकला आहे. यंदाच्या सहा महिन्यांत अनपेड चलानमध्ये ५.२८ कोटींची भर पडली आहे.

१४९ चलानधारक कोर्टात

  • अनपेड चलानधारकांनी त्यांच्या वाहनांवरील दंड वाहतूक शाखेसह जवळच्या पोलिस ठाण्यात भरावा.
  • दंड थकीत राहिल्यास संबंधित वाहनधारकांचा परवाना निलंबित केला जातो.
  • प्रसंगी तो रद्ददेखील केला जातो, तसेच दंडाकडे पाठ फिरविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध न्यायालयात खटला भरला जातो.
  • ते टाळण्यासाठी वाहन चालकांनी आपल्याकडे थकीत दंडाची रक्कम त्वरेने भरावी, असे आवाहन ग्रामीण वाहतूक शाखेने केले आहे. १४९ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAmravatiअमरावती