अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे एका २५ वर्षीय हिस्ट्रिशिटर आरोपीचा खून करण्यात आला. गुरूवारी सकाळी ही घटना उघड झाली.
धीरज गायगोले (२५, रा. लोणी) असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, बुधवारी रात्री त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्याला रक्तबंबाळ स्थितीत येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंदकुमार दवणे करीत आहेत.