शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अखेर उलगडा!अमरावतीत मुलाने जन्मदात्याला संपविले, पुतण्याही मारेकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 1:39 PM

तरोडा जगताप शिवारातील प्रभाकर जगताप यांच्या शेतात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांनी पोलीस पाटलांकरवी देण्यात आली.

अमरावती: दारूच्या आहारी गेलेल्या बापाला पोटच्या तरूण मुलाने जीवाने संपविले. त्याने त्यात चुलतभावाला देखील सहभागी करून घेतले. २० मे रोजी सकाळी तरोडा जगताप शिवारात ही घटना उघड झाली. सतीश गंगाधर कुरटकार (४२,रा. जळगाव आर्वी, ता. धामणगाव रेल्वे) असे मृताचे नाव आहे. काही तासातच मृताची ओळख पटल्यानंतर त्याचा खून झाल्याचा उलगडा देखील झाला. ओळख पटण्यापुर्वी काही वेळाकरीता हत्या की आत्महत्या असा संभ्रम निर्माण झाला होता.

याप्रकरणी, कुऱ्हा पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून मृताचा मुलगा अभी सतीश कुरटकर (१९, रा. जळगाव आर्वी) व पुतण्या यश जगदिश कुरटकार (१९, रा. खडकसावंगा, बाभुळगाव) यांच्याविरूध्द कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही तातडीने अटक केली. अवघ्या काही तासात मृताची ओळख पटवून कुऱ्हा पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले. सतीश कुरटकर हा दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन नेहमीच कुटुंबियांसह अन्य जणांशी देखील वाद करायचा. त्यामुळे जगणे मुश्किल झाले होते, त्या कारणावरुन खून केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे. २० मे रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास उघड झालेल्या या घटनेप्रकरणी शनिवारी सायंकाळी ७.३४ च्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला.शिवारात आढळला मृतदेह

तरोडा जगताप शिवारातील प्रभाकर जगताप यांच्या शेतात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांनी पोलीस पाटलांकरवी देण्यात आली. त्यामाहितीनुसार, कुऱ्हाचे ठाणेदार गीता तांगडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी एका तरूण व्यक्तीचा मृतदेह असून, त्याच्या पोटावर, कमरेच्यावर व पायावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. पंचनामा करत पोलिसांनी मूतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस पाटलासह अन्य लोकांची मदत घेतली. तर मृताचा फोटो सोशल व्हायरल करण्यात आला. त्यामुळे लगेचच मृताची ओळख पटली. दोन्ही आरोपी सतीशला शिवारात घेऊन गेले होते.आरोपींच्या बयाणानुसार, मृतक हा दारूच्या आहारी गेला होता. मुलगा व पुतण्या त्याला शेतात घेऊन गेले. तेथे तिघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. त्यातून सतीश कुरटकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आरोपींना अटक केली.गीता तांगडे, ठाणेदार, कुऱ्हा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी